तुमचा मध्य प्रदेश इतका मोठा कसा? कपालभाती करून दाखवा, 10 हजार रुपये देईन - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:09 PM2022-05-31T12:09:36+5:302022-05-31T12:11:46+5:30
Mamata Banerjee : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी पक्ष कार्यकर्त्याशी त्याचे वजन आणि तब्येत याविषयी बोलताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये त्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याशी गमतीशीर बोलत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या पक्ष कार्यकर्त्याशी त्याचे वजन आणि तब्येत याविषयी बोलताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता निवेदन देताना दिसत आहे. मग ममता बॅनर्जी त्यांना थांबवतात आणि म्हणतात, 'तुमचे पोट ज्या प्रकारे वाढत आहे, तुम्ही कधीही पडू शकता. तुमची तब्येत ठीक आहे का?' यानंतर पक्षाचा कार्यकर्ता सांगतो की, मला कोणताही आजार नाही, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच, मला ना मधुमेह आहे, ना रक्तदाब आहे, असे म्हणत कार्यकर्ता ममता बॅनर्जींना आपला दिनक्रम सांगतो.
यानंतर, ममता बॅनर्जी पुन्हा कार्यकर्त्याला गमतीशीरपणे म्हणतात, 'कोणती ना कोणती तरी समस्या आहे. तुमचा एवढा मोठा 'मध्य प्रदेश' कसा असू शकतो?' त्याला उत्तर देताना कार्यकर्ता म्हणतो की, मी रोज सकाळी पकोडे खातो, त्यामुळेच माझे पोट खूप वाढले आहे. तसेच, ममता बॅनर्जी कार्यकर्त्याला विचारतात की, रोज व्यायाम करता की नाही? यावर त्याने सांगितले की, तो रोज 1000 कपालभाती प्राणायाम करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही.
“how has your MadhyaPradesh (tummy) grown so big?” CM #MamataBanerjee was caught worried about the health of her municipality leader who weighs 125 kgs yet admittedly eats pakoras every morning. The conversation is hilarious. The chairman tried hard to prove his workout abilities pic.twitter.com/hDZw3OFamQ
— Tamal Saha (@Tamal0401) May 30, 2022
1000 कपालभाती करण्याचे दिलेआव्हान
यावर ममता बॅनर्जी म्हणतात की, हे शक्य नाही. जर तुम्ही मला 1000 कपालभाती करून दाखवविला तर मी आता 10 हजार रुपये देईन. आपल्याला श्वास कसा घ्यायचा आणि बाहेर कसा घ्यावा हे देखील माहित नाही. ममता आणि पक्ष कार्यकर्त्याच्या या संवादावर सभेत बसलेले इतर कार्यकर्ते हसताना दिसत आहेत.