Doctors Strike : मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 10:49 AM2019-06-14T10:49:07+5:302019-06-14T11:02:37+5:30
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत.
मुंबई - कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून शुक्रवारी (14 जून) राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल.
कोलकात्यातील मारहाणीचा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रलमार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
Nagpur: Doctors with 'Save the Saviour' & 'Stand with NRSMCH' posters at Government Medical College, hold protest over violence against doctors in West Bengal. #Maharashtrapic.twitter.com/0jRGeW5qyF
— ANI (@ANI) June 14, 2019
सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का, असा सवाल मार्डने उपस्थित केला. आमच्या सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून थकलो आहोत. आता आमचा संयम संपलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली.
Delhi: Patients and their relatives outside the OPD at All India Institutes of Medical Sciences (AIIMS). Resident Doctors Association (RDA) of AIIMS is on strike today over violence against doctors in West Bengal. pic.twitter.com/rRCeZqDfxr
— ANI (@ANI) June 14, 2019
डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा
या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. शिवाय संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये धरणे आंदोलन करून निषेध करण्याचे आवाहन आयएमएने दिले आहे. याखेरीज, इंडियन मेडिकल असोसिएशनने सातत्याने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित शासकीय विभागांना पत्र पाठविण्याचे आवाहनही असोसिएशनच्या वतीने केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयएमएने दिली आहे.
Delhi: Resident Doctors' Association, Safdarjung Hospital holds protest over violence against doctors in #WestBengal. pic.twitter.com/qFELP2hXuX
— ANI (@ANI) June 14, 2019
'डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट'
ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेली निदर्शन ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा डाव असून आपण त्याचा निषेध करते. डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट आहे असं म्हटलं आहे. माकपच्या सहकार्याने भाजप हिंदी-मुस्लीम राजकारण करत आहे. त्यांचे हे प्रेम पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जातीय तणाव निर्माण करण्यास खतपाणी घालत आहेत आणि फेसबुकवर अपप्रचार करत आहेत, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Delhi: Doctors at All India Institute of Medical Sciences (AIIMS) prepare to observe strike over violence against doctors in West Bengal. pic.twitter.com/pza71njjum
— ANI (@ANI) June 14, 2019
Kolkata: Students of NRS Medical College & Hospital sit on a protest over violence against doctors. #WestBengalpic.twitter.com/LgPYkFYsKv
— ANI (@ANI) June 14, 2019
Hyderabad: Doctors at Nizam's Institute of Medical Sciences hold protest march over violence against doctors at West Bengal's NRS Medical College & Hospital. pic.twitter.com/Y3BsYjxTZ8
— ANI (@ANI) June 14, 2019