West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:08 PM2019-05-23T14:08:12+5:302019-05-23T14:09:15+5:30

ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती.

West Bengal Election Results 2019 live result : Will BJP's Mamata Banerjee Construct in West Bengal? | West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

googlenewsNext

कोलकाताः ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना आव्हान दिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये मोदी 24 जागांवर विजय मिळवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तृणमूल काँग्रेसला यंदा 22 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. तर काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते बाबूल सुप्रियो यांनी आसनसोल आणि एस. एस. अहलुवालिया बर्दवान-दुर्गापूर जागावरून मजबूत आघाडी घेतली आहे.

बाबूल सुप्रियो यांनी तृणमूलचे प्रतिस्पर्धी उमेदवार मुनमुन यांच्यावर 50 हजारांची आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणूक 2019 यंदा पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाचं पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदी-शाहांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळतानाही पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या, ममतांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदनही केलं आहे. पण पराभव झालेले सगळेच हरलेले नाहीत. आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेणार असून, नंतरच प्रतिक्रिया देऊ, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

'एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून म्हटले होते. यावरून ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, 'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू, असंही त्या म्हणाल्या आहेत. 
 

Web Title: West Bengal Election Results 2019 live result : Will BJP's Mamata Banerjee Construct in West Bengal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.