ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:59 PM2020-12-22T22:59:28+5:302020-12-22T23:01:55+5:30

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय कमांडलाही निशाण्यावर घेतले होते.

West Bengal four ministers including tmc leader rajib banerjee were absent in the cabinet meeting | ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण

ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकला TMCचे तब्बल चार मंत्री गैरहाजर राहिले.नुकतेच शुभेन्दु अधिकारी यांच्यासह टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत.

कोलकाता :पश्चिम बंगालमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकला TMCचे तब्बल चार मंत्री गैरहाजर राहिले. यात राजीव बॅनर्जी, गौतम देव, रविंद्रनाथ घोष आणि चंद्रनाथ सिन्हा यांचा समावेश आहे. नुकतेच शुभेन्दु अधिकारी यांच्यासह टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

यासंदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चटर्जी म्हणाले, की या मंत्र्यांनी नक्कीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण बैठकीला का उपस्थित राहू शकलो नाही, यासंदर्भात माहिती दिली असेल. मात्र, इतर नेत्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात कसल्याही प्रकारची चर्चा नाही. पण, राजीव बॅनर्जी यांच्या न येण्याने, ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय कमांडलाही निशाण्यावर घेतले होते. यानंतर पार्थ चटर्जी आणि प्रशांत किशोर यांनीही राजीव बॅनर्जी यांच्यासोबत बैठक केली होती. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही राजीव बॅनर्जी भाजपच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

 तृणमूलचे आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपत -
गेल्या आठवड्यातच आजी-माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत अमित शहंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  यानंतर आता राजीव बॅनर्जींसह चार मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकिला अनुपस्थित असल्याने पुन्हा ममतांना धक्का बसतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 
 

Web Title: West Bengal four ministers including tmc leader rajib banerjee were absent in the cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.