पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८१ टक्के मतदान
By admin | Published: May 7, 2014 07:07 AM2014-05-07T07:07:46+5:302014-05-07T20:01:15+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील ६४ जागांसाठी बुधवारी मतदान उत्साहात पार पडले असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८१ टक्के मतदान झाले.
Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील ६४ जागांसाठी बुधवारी मतदान उत्साहात पार पडले असून पश्चिम बंगालमध्ये (संध्याकाळी सहा पर्यंत) सर्वाधिक ८१ टक्के मतदान झाले. तर इतर सहा राज्यांमध्येही मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला.
पश्चिम बंगालपाठोपाठ आंध्र प्रदेशात सर्वाधिक ७६ टक्के मतदान झाले. तर बिहारमध्ये ५८ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ५० टक्के , उत्तराखंडमध्ये ६२ टक्के तर, हिमाचल प्रदेशमध्ये ६५ टक्के मतदान झाले. तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात एकूण ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून अलाहबादमध्ये ५२ टक्के, अमेठीत ५४ टक्के, आंबेडकर नगरमध्ये ५९ टक्के, भरीच येथे ५७ टक्के, बलरामपूरमध्ये ५१ टक्के आणि बाराबंकीत ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात सात राज्यांमधील १,७३१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले असून आंध्रप्रदेशात २५, उत्तरप्रदेशमध्ये १५, बिहार ७, पश्चिम बंगालमध्ये ६, उत्तराखंडमधील ५, हिमाचल प्रदेशमधील ४ तर जम्मू आणि काश्मीरमधील २ जागांसाठी मतदान झाले आहे.
> उमेदवार : राहुल गांधी, स्मृती इराणी, वरुण गांधी, श्रीनिवास रेड्डी, डी. पुरंदेश्वरी, रामविलास पासवान, राबडी देवी, राजीव प्रताप रुडी, मोहंमद कैफ.
> पक्षीय बलाबल आंध्र प्रदेश : काँग्रेस २१, तेलुगू देसम पार्टी ४. बिहार : संयुक्त जनता दल ४, राष्ट्रीय जनता दल २, भाजपा १ हिमाचल प्रदेश : भाजपा ३, काँग्रेस १. जम्मू आणि काश्मीर : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स १, अपक्ष १ उ. प्रदेश : काँग्रेस ७, बहुजन समाज पार्टी ५, समाजवादी पार्टी ३. उत्तराखंड : काँग्रेस ५. पश्चिम बंगाल : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ४, भारतीय कम्युनिस्ट पार्टी १, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक १
> अशा आहेत प्रमुख लढती आंध्र प्रदेश : गुंटूर : जयदेव गाला (तेलुगू देसम पार्टी), कडप्पा : श्रीनिवास रेड्डी (तेलुगू देसम पार्टी), राजमपेट : डी. पुरंदेश्वरी (भाजपा), पल्लम राजू (काँग्रेस) बिहार : हाजीपूर : रामविलास पासवान (लोजपा), सारन : राबडी देवी (राजद) विरुद्ध राजीव प्रताप रुडी (भाजपा) हिमाचल प्रदेश : कांगरा : शांता कुमार (भाजपा) उत्तर प्रदेश : अमेठी : राहुल गांधी (काँग्रेस) विरुद्ध स्मृती इराणी (भाजपा) विरुद्ध कुमार विश्वास (आप), सुलतानपूर : वरुण गांधी (भाजपा) विरुद्ध अमिता सिंह (काँग्रेस), फुलपूर : मोहम्मद कैफ (काँग्रेस), गोंदा : बेनीप्रसाद वर्मा (काँग्रेस), अलाहाबाद : आदर्श शास्त्री (आप) उत्तराखंड : गढवाल :बी.सी. खंडुरी (भाजपा), टेहरीगढवाल : साकेत बहुगुणा (काँग्रेस) प. बंगाल : आसनसोल : बाबुल सुप्रियो (भाजपा), बांकुडा : मुनमुन सेन (तृणमूल काँग्रेस)
काश्मीरमध्ये मतदान केंद्राजवळ स्फोट
जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत असून उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला-कुपवाडा मतदारसंघामधील मतदान केंद्रांवर ग्रेनेड फेकण्यात आल्याने स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तसेच अनेक मतदान केंद्रांवर दगडफेकही करण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या हल्ल्यांमुळे मतदान संथगीतने सुरू असून हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बिहारमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, एक ठार
दरम्यान काश्मीरमधील स्फोटांनतर बिहारमध्ये एका व्होटिंग बूथवर गोळीबार झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सीतामढी येथे बूथ क्रमांक २२४ लुटण्याचा प्रयत्न केला गेला असता, पोलिसांनी गोळीबार केला व त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.