कोलकाता बलात्कार प्रकरण : सौरव गांगुलीनं चूक सुधारली, टीकेनंतर डीपी केला 'ब्लॅक', म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:30 PM2024-08-20T12:30:12+5:302024-08-20T12:31:02+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही याविरोधात आवाज उठवला आहे. त्यानेही न्यायाची मागणी करणाऱ्या हजारो लोकांसोबत एकजूटता दाखवत आपला सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरही 'ब्लॅक' केला आहे. रुग्णालयातील या घटनेविरोधात आता अशा प्रकारे एक ऑनलाइन मोहीमही सुरू झाली आहे.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही याविरोधात आवाज उठवला आहे. त्यानेही न्यायाची मागणी करणाऱ्या हजारो लोकांसोबत एकजूटता दाखवत आपला सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरही 'ब्लॅक' केला आहे. रुग्णालयातील या घटनेविरोधात आता अशा प्रकारे एक ऑनलाइन मोहीमही सुरू झाली आहे.
सौरव गांगुलीने कोलकात्याच्या सुरक्षिततेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर झालेल्या टीकेनंतर सौरव गांगुलीने आपला डीपी ब्लॅक केला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यानंतर, त्याच्यावर गुन्ह्याचे गांभीर्य कमी केल्याचा आरोप झाला होता. यानंतर रविवारी स्पष्टीकरण देत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे गांगुलीने म्हटले होते. तसेच, एका मुलीचा पिता म्हणूनही त्याने या घटनेवर चिंताही व्यक्त केली.
गांगुलीनही केली कठोर शिक्षेची मागणी -
गांगुली म्हणाला, "गेल्या रविवारी मी काय बोललो होतो आणि ते कशा पद्धतीने सादर केले गेले, मला माहीत नाही. ही एक अत्यंत भयंकर घटना आहे, हे मी आधीही म्हटले आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे घडले, ते अत्यंत लज्जास्पद आहे. मला आशा आहे की, गुन्हेगाराला शोधल्यानंतर सीबीआय कठोरात कठोर शिक्षा देईल. शिक्षा अशी असावी की, आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. हे महत्त्वाचे आहे. शिक्षा कठोर असावी"
#NewProfilePicpic.twitter.com/WiHJwDf6z1
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 19, 2024
काय म्हणाला होता गांगुली? -
11 ऑगस्टला कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाला होता, "घटना अत्यंत दुर्दैवी आणि भीतीदायक आहे. कठोरात कठोर करावाई करण्यात यावी. सर्व काही कुठेही शक्य आहे. यामुळे सीसीटीव्हीच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था करायला हवी. अशी घटना कुठेही होऊ शकते. कठोर करवाई करण्यात यावी."
या वक्तव्यामुळे झाली होती टीका -
एक व्हायरल व्हिडिओमध्ये गांगुली पुढे म्हणाला, "मला असे वाटत नाही की, एखाद्या घटनेवरून सर्वकाही अंदाज बांधावा. यामुळे सर्व काही अथवा कुणीही सुरक्षित नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. अशा घटने संपूर्ण जगात होत असतात. यामुळे मुली सुरक्षित नाहीत, असा विचार करणे चूक आहे. केवळ पश्चिम बंगालच नाही, तर संपूर्ण देशात महिला सुरक्षित आहेत. एका घटनेवरून कुणाबद्दल मत बनवू नये."