संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:17 PM2024-04-04T17:17:05+5:302024-04-04T17:17:56+5:30

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला गेले होते. त्याठिकाणी मोदींनी तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली. 

West Bengal Loksabha Election 2024: Narendra Modi criticizes Mamata Banerjee's India alliance with Trinamool Congress | संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

कूचबिहार - Narendra Modi on TMC ( Marathi News ) गेल्या १० वर्षात जो विकास झाला आहे तो फक्त ट्रेलर आहे. माझं कुटुंब नाही असं विरोधक म्हणतात, पण संपूर्ण भारत माझं कुटुंब आहे. संदेशखालीच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कुणी संपूर्ण ताकद लावल्याचं बंगालच्या जनतेनं पाहिलंय. संदेशखालीमध्ये महिलांसोबत जे घडलं, ते टीएमसीच्या अत्याचाराचं टोक होतं. संदेशखालीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच, त्यांना आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

पश्चिम बंगालच्या कूचबिहार इथं मोदींची रॅली होती. त्यात मोदी म्हणाले की, मी भ्रष्टाचार हटाओचा नारा देतोय तर विरोधी पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना बचाओ म्हणतंय. भाजपा सरकारनं CAA कायदा आणला. परंतु इंडिया आघाडी त्याबाबत चुकीचा भ्रम लोकांमध्ये पसरवतंय. इंडिया आघाडीचे टीएमसी, डावे आणि काँग्रेस खोटं बोलून राजकारण करतात असं त्यांनी आरोप केला. 

त्याचसोबत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात ६-७ दशकं लोकांनी केवळ आणि केवळ काँग्रेसचं मॉडेल पाहिले. मागील १० वर्षात देशानं पहिल्यांदा संपूर्ण बहुमत असलेलं भाजपा सरकारचं मॉडेल पाहिले. आज जगभरात भारताचं कौतुक होत आहे. सरकार अनेक मोठमोठे निर्णय घेत आहे. कारण १४० कोटी भारतीय जनतेचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मोदी भारताच्या जनतेचा सेवक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटलं.

दरम्यान, बंगालच्या विकासासाठी या राज्यात भाजपाला मजबूत होणं गरजेचे आहे. याठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार केवळ भाजपाच रोखू शकते. तृणमूल सरकारने संदेशखालीच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी ताकद वापरली. इंडिया आघाडी याठिकाणी वेगवेगळी लढते, दिल्लीत एकत्र आहेत. याठिकाणी तृणमूलचे गुंड तुम्हाला मतदान करण्यापासून रोखतील तर पूर्ण हिंमतीने उभं राहा. निवडणूक आयोग जागरूक आहे. तुमच्या प्रत्येक मताची किंमत आहे. त्यामुळे निर्भीडपणे मतदान करायला बाहेर या असं आवाहनही मोदींनी जनतेला केले. 

Web Title: West Bengal Loksabha Election 2024: Narendra Modi criticizes Mamata Banerjee's India alliance with Trinamool Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.