'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:12 AM2021-06-21T11:12:06+5:302021-06-21T11:14:15+5:30

पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना; सीबीआयनं हाती घेतला तपास

west bengal man found alive who declared dead in 2010 jnaneswari express accident | 'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

Next

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे विभागाशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१० मध्ये म्हणजेच ११ वर्षांपूर्वी जनेश्वरी एक्स्प्रेसला अपघात झाला. या अपघातात मृत घोषित करण्यात आलेली व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनीच तो अपघातात दगावल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि नोकरीदेखील घेतली होती.

२०१० मध्ये मृत घोषित करण्यात आलेली व्यक्ती आता ११ वर्षांनंतर जिवंत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, त्या व्यक्तीच्या बहिणीला (सरकारी नोकरी मिळालेली व्यक्ती) सीबीआयनं चौकशीसाठी बोलावलं आहे. तिच्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात

मे २०१० मध्ये हावडा-मुंबई जनेश्वरी एक्स्प्रेसला अपघात झाला. एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवर घसरले. या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. झारग्राम इथे मालगाडीची धडक बसल्यानं हा अपघात झाला होता. या अपघातात मुलगा गमावल्याचा दावा एका व्यक्तीनं केला होता. डीएनए नमुन्यांच्या करण्यात आलेल्या या दाव्यानंतर रेल्वेनं नियमानुसार मृताच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या बहिणीला पूर्व रेल्वेत सिग्नल विभागात नोकरी देण्यात आली. मात्र ती व्यक्ती जिवंत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर रेल्वेनं तपासासाठी एक समिती नेमली. त्यानंतर हा तपास सीबीआयनं आपल्या हाती घेतला. आता या प्रकरणातील गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे.

Web Title: west bengal man found alive who declared dead in 2010 jnaneswari express accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.