"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:15 IST2025-04-16T13:14:05+5:302025-04-16T13:15:31+5:30
मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...!

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. "भाजपने बाहेरील लोक बोलावून हिंसाचार घडवला. वक्फच्या मुद्यावरून लोकांना भडकवण्यात आले. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार, हा सुनियोजित कट होता. घुसखोरांना का येऊ दिले गेले? मी I.N.D.I.A. ला या मुद्द्यावर संघटित येण्याचे आवाहन करते. याचा परिणाम सर्वांवरच होईल. आम्हाला शांतता हवी आहे," असे ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे. त्या बुधवारी वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर इमामांना संबोधित करत होते.
जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही -
ममता पुढे म्हणाल्या, "आम्ही हिंदू आणि मुसलमानांचे विभाजन होऊ देणार नाही. एका कुण्याचा एका प्रश्न नाही. वक्फवर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गप्प का आहेत. या लोकांना केवळ सत्तेची चिंता आहे. जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही."
मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते -
याच बरोबर, उत्तर प्रदेश आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून पश्चिम बंगालला बदनाम केले जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. भाजप खेटे व्हिडिओ दाखवून बदनाम करत आहे. मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते.
सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी -
"सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. जर तुम्हाला बंगालबद्दल बोलायचेच असेल, तर माझ्यासमोर बोला. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करतो. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याच्या भाजपच्या कटात अडकू नका," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.