रातोरात कोट्याधीश झालेल्या 'त्या' व्यक्तीने केली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी; काय घडलं एका रात्रीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:23 PM2020-01-03T16:23:29+5:302020-01-03T16:24:35+5:30
रविवारी एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यानंतर दुसर्या दिवशी नारायण सेन यांनी कालना पोलीस स्टेशन गाठले
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यात राहणारे ७० वर्षीय इंद्र नारायण सेन यांनी पोलिसांकडे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सामान्य कुटुंबातील इंद्र नारायण सेन यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. याचं कारणही तसचं आहे. आजतागायत कधीही लोकप्रिय नसणारे इंद्र नारायण सेन अचानक चर्चेत आल्याने दिवसेंदिवस ते अस्वस्थ होत आहेत. त्याचे कारण असं की इंद्र सेन यांना एक कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे आणि आता त्याने पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली आहे.
रविवारी एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यानंतर दुसर्या दिवशी नारायण सेन यांनी कालना पोलीस स्टेशन गाठले आणि स्वत: एसएचओ राकेश सिंह यांच्याकडे संरक्षण देण्याची मागणी केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की तो जेव्हा रातोरात मी कोट्याधीश झालो आहे. तेव्हापासून घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे. सुमारे दशकांपूर्वी ट्यूबवेल ऑपरेटरच्या नोकरीतून निवृत्त झालेले नारायण सेन अवघ्या 10,000 रुपयांच्या पेन्शनवर जगतात. पण रविवारी हा चमत्कार झाला जेव्हा त्याने 1 कोटींची लॉटरी जिंकली.
रविवारी इंद्र नारायण सेन यांनी नागालँड राज्य लॉटरीची 10 तिकिटे 60 रुपयांमध्ये खरेदी केली. त्यांनी शांतपणे तिकिटे खिशात ठेवली आणि निकालही पाहिला नाही. मात्र, तिकिटांची विक्री करणाऱ्या मिंटू विश्वासने निकाल पाहिला आणि रात्री आठ वाजता समजले की त्याच्या दुकानातून विकल्या गेलेल्या तिकिटांवर लॉटरी लागली आहे.