पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७४ टक्के मतदान
By admin | Published: May 5, 2016 04:22 PM2016-05-05T16:22:14+5:302016-05-05T16:22:14+5:30
मतदारांनी सकाळी ज्या पद्धतीने भरघोस मतदान केले तोच ओघ दुपरपर्यंत कायम राहिला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ७४.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकता, दि. ५ : पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळपासून सुरवात झाली. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ४५.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांनी सकाळी ज्या पद्धतीने भरघोस मतदान केले तोच ओघ दुपारपर्यंत कायम राहिला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ७४.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सहा हजार ७७४ मतदान केंद्रांवर ५८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कुचबिहार जिल्ह्यातील सीमेवरील भागातील रहिवाशी स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की केंद्रीय सुरक्षा दलाच्या १२३ कंपन्या कुचबिहार जिल्ह्यात, तर १३८ कंपन्या ईस्ट मिदनापूर येथे तैनात केल्या जात आहेत. याशिवाय साडेचार हजार पोलिस कर्मचारी मदतीला असणार आहेत. दोन जिल्ह्यांत २५ मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून, शीघ्र कृती दलाच्या १८३ तुकड्या काल रात्रीपासून विविध मतदारसंघांत पाठविण्यात आल्या आहेत.