West Bengal SSC Scam: 'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:57 PM2022-07-25T19:57:53+5:302022-07-25T19:58:50+5:30
West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया आली आहे. 'कोणी चूक केली असेल, तर त्याला कितीही मोठी शिक्षा झाली तरी मला त्याची पर्वा नाही. अशा लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही', असे विधान ममतांनी केले. त्यांच्या या विधानावरुन, त्या पार्थ यांच्यापासून अंतर ठेवत असल्याचे दिसत आहे.
ईडीने 14 दिवसांची रिमांड मागितली
पार्थ चॅटर्जीच्या अटकेनंतर सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मी भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु मी माझ्या विरोधात चालवल्या जात असलेल्या दुर्भावनापूर्ण मोहिमेची निंदा करते. त्या महिलेशी (अर्पिता मुखर्जी) सरकारचा काहीही संबंध नाही. राजकारण हा माझ्यासाठी बलिदान आहे आणि तृणमूल चोरंना माफ करत नाही. भाजप माझ्या पक्षाला नष्ट करण्यासाठी एजन्सीटा वापर करत आहे, पण सत्य बाहेर येईल,' असेही त्या म्हणाल्या.
ममतांनी फोन उचलला नाही
शनिवारी ईडीने पार्थ चॅटर्जीला अटक केल्यानंतर, त्यांनी ममता बॅनर्जी यांना तीनदा फोन केला होता. मात्र, ममतांनी त्यांचा फोन उचलला नाही. या प्रकरणात सरकारमधील मंत्र्याचे नाव समोर आल्यामुळे, ममता बॅनर्जी यांनी पार्थपासून स्वतःला दूर केले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पार्थला शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. अटकेनंतर पार्थने आजारी असून रुग्णालयात दाखल करावे, असे सांगितले होते.
भुवनेश्वरच्या एम्समध्ये दाखल
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार्थला कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, यानंतर ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन सांगितले की, त्याला कोलकात्याबाहेरच्या रुग्णालयात आणण्याचे आदेश द्यावेत. कारण ते कोलकात्यात आपल्या प्रभावाटा वापर करू शकतो. यानंतर हायकोर्टाने त्यांना भुवनेश्वरच्या एम्समध्ये नेण्यास सांगितले.