पश्चिम बंगाल: शपथविधीवरून तृणमूलचे आमदार आंदोलनाला बसले; राज्यपाल दिल्लीत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:43 PM2024-06-27T15:43:54+5:302024-06-27T15:44:27+5:30

नुकत्याच निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधीवरून मानापमान नाट्य सुरु झाले असून शपथविधी घेतला नाही म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आलेले आमदार विधानभवनाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ धरणे आंदोलनाला बसले आहेच. 

West Bengal: Trinamool MLAs protest over oath taking; The Governor reached Delhi | पश्चिम बंगाल: शपथविधीवरून तृणमूलचे आमदार आंदोलनाला बसले; राज्यपाल दिल्लीत पोहोचले

पश्चिम बंगाल: शपथविधीवरून तृणमूलचे आमदार आंदोलनाला बसले; राज्यपाल दिल्लीत पोहोचले

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल बदलले तरी राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद कायम आहे. नुकत्याच निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधीवरून मानापमान नाट्य सुरु झाले असून शपथविधी घेतला नाही म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आलेले आमदार विधानभवनाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ धरणे आंदोलनाला बसले आहेच. 

राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी लवकरात लवकर विधानसभेत शपथ द्यावी, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. नवनिर्वाचित आमदार सयांतिका बंदोपाध्याय आणि रायत हुसैन हे दोघे आंदोलनाला बसले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही आमदार विजयी झाले आहेत.

या दोन्ही आमदारांना बुधवारी राजभवनात शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतू, पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना शपथ देण्याची जबाबदारी ही विधानसभा अध्यक्षांची असते, असा प्रघात असल्याचा दावा तृणमूलने केला आणि तिथेच माशी शिंकली. राज्यपाल बोस यांनी विधानसभेत शपथविधी आयोजित करण्यास नकार दिला आणि ते 26 जूनच्या संध्याकाळी ते नवी दिल्लीला निघून गेले. 

शपथविधी पार पडण्यासाठी आम्ही बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत राज्यपालांची वाट पाहिली. ते आलेच नाहीत. जनतेसाठी काम करण्याचा आमचा संविधानिक अधिकार कोणताही विलंब न लावता पूर्ण झाला पाहिजे, ही मागणी आहे असे म्हणत दोन्ही आमदार आज आंदोलनाला बसले आहेत. 

बोस यांचे स्पष्टीकरण...
यावर बोस यांचे स्पष्टीकरण आले आहे. घटनेने आमदारांना शपथ देण्याचे काम कोणाकडे सोपवायचे हे ठरवण्याचा अधिकार मला दिला आहे. मला विधानसभेत शपथविधी घेण्यास काहीच अडचण नव्हती. परंतू, ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी पत्र लिहिले आहे, त्यावरून आता ही शक्यता नाही, असे बोस म्हणाले आहेत. 

Web Title: West Bengal: Trinamool MLAs protest over oath taking; The Governor reached Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.