धक्कादायक! चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर चार दिवस शाळेतच सातत्यानं बलात्कार, शिक्षक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 12:32 PM2018-04-22T12:32:38+5:302018-04-22T12:32:38+5:30

काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे.

West Bengal Two students allegedly raped by teacher in Raiganj, North Dinajpur district | धक्कादायक! चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर चार दिवस शाळेतच सातत्यानं बलात्कार, शिक्षक फरार

धक्कादायक! चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर चार दिवस शाळेतच सातत्यानं बलात्कार, शिक्षक फरार

दिनाजपूर- काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज भागात एका शिक्षकानं दोन विद्यार्थिनींवर सतत चार दिवस बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण सरकारी प्राथमिक शाळेत झालं आहे. शुक्रवारी जेव्हा एका मुलीनं शाळेत जाण्यास नकार दिला, त्यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला.

35 वर्षांचा आरोपी शिक्षक हा विवाहित असून, तो सध्या फरार झाला आहे. आरोपी शिक्षकानं दोन्ही विद्यार्थिनींवर शाळा सुटल्यानंतर चार दिवस बलात्कार केला आहे. तसेच या प्रकराची कुठेही वाच्यता केल्यात तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्या शिक्षकानं मुलींना दिली होती. एका मुलीच्या पालकांनी जेव्हा मुलीला शाळेत न जाण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पहिल्या पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दुस-या विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधला आणि दोघी पीडितेच्या पालकांनी राजगंज पोलिसांत आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी दोन्ही विद्यार्थिनींचं जिल्हा रुग्णालयात मेडिकल करण्यात आलं.



 

Web Title: West Bengal Two students allegedly raped by teacher in Raiganj, North Dinajpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.