ममतांना पुन्हा धक्का, आमदार बनसरी मैतींचा राजीनामा, गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 10:13 PM2020-12-18T22:13:56+5:302020-12-18T22:14:31+5:30

West Bengal: आगामी विधासभा निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

West Bengal: Uttar Kanthi MLA Banasri Maity tenders resignation from the primary membership of Trinamool Congress (TMC) and from each and every post of the party. | ममतांना पुन्हा धक्का, आमदार बनसरी मैतींचा राजीनामा, गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम

ममतांना पुन्हा धक्का, आमदार बनसरी मैतींचा राजीनामा, गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम

Next
ठळक मुद्देतृणमूल काँग्रेसचे आमदार बनसरी मैती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. त्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आगामी विधासभा निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. 

यातच शुक्रवारी आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगाल कांथी मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार बनसरी मैती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आज सकाळी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस कबीरुल इस्लाम यांनीही आपला राजीनामा दिला आहे. गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी राजीनामा दिला आहे.


बनसरी मैती हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी जानेवारी 2021 पर्यंत 60-65 आमदार सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सोडतील, असे राज्यातील भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी म्हटले होते. गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदु अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी आणि शीलभद्र दत्ता यांनीही पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जितेंद्र तिवारी हे सध्या पांडेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच, ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. शुभेंदु अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2007 मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

शुभेंदू अधिकारी यांचा राजीनामा नाकारला
पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी शुभेंदू अधिकारी यांचा राजीनामा नाकारला आहे. राजीनामा योग्य स्वरुपात (फॉर्मेट) नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शुभेंदू अधिकारी यांना २१ डिसेंबरला स्वत: येऊन  राजीनामा द्यावा लागेल, असे अध्यक्षांनी  सांगितले आहे.

Web Title: West Bengal: Uttar Kanthi MLA Banasri Maity tenders resignation from the primary membership of Trinamool Congress (TMC) and from each and every post of the party.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.