पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:34 PM2022-09-12T18:34:17+5:302022-09-12T18:34:28+5:30

भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

west bengal | will bjp and left joins hand to defeat mamata banerjee? leader of opposition suvendu adhikari offered | पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

Next

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिहारच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच बंगालच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले भाजप आणि डावे एकत्र येऊन ममता बॅनर्जींविरुद्ध एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 

डाव्यांना सोबत येण्याचे आवाहन 
विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी डाव्यांना नबन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 13 सप्टेंबरला जे घडणार आहे, ते बंगालमध्ये 75 वर्षांत कोणीही पाहिले नाही. CBI मुख्यालयामध्ये जाण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला खरोखरच ममता बॅनर्जींचे सरकार पाडायचे असेल तर 13 सप्टेंबरला आमच्यासोबत नबनला भेट द्या.

'चोर धरो, जेल भरो' अशा घोषणा देत शुक्रवारी सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये डाव्यांनी गोंधळ घातला होता. ईडी-सीबीआयने भ्रष्टाचाराचा योग्य तपास करावा, अटक केलेल्यांना तात्काळ शिक्षा व्हावी आणि नोकरभरती घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागण्या डाव्यांनी केल्या होत्या. मात्र, डाव्यांच्या सीजीओ मोहिमेबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, सीजीओ मोहिमेतून काहीही होणार नाही. भ्रष्ट ममता बॅनर्जी सरकार पाडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपसोबत एकत्रित प्रचार करणे.

डाव्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला
डाव्या नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांची ही हाक धुडकावून लावली. सीपीएम नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, 'आंदोलन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे हे भाजप नेते ठरवतील का? डाव्यांनी आंदोलनाचा मार्ग दाखवला. विरोधक आता तोच मार्ग अवलंबत आहेत.' डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस रॅलीत म्हणाले की, 'सध्याचे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत आहे, ते थांबवले पाहिजे. आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही.' 

 

Web Title: west bengal | will bjp and left joins hand to defeat mamata banerjee? leader of opposition suvendu adhikari offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.