ओलाचा लोचा; गाडी चालवताना चाकच तुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:34 AM2022-05-27T06:34:10+5:302022-05-27T06:34:30+5:30
हे वाहन श्रीनाद मेनन या ग्राहकाच्या मालकीचे आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘ओला एस१ प्रो’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पुढच्या चाकच निखळून पडल्याची घटना समोर आली आहे. ओलाच्या स्कूटर्सला आग लागण्याच्या काही घटना घडल्यामुळे ही कंपनी वादात सापडली असतानाच आता ओलाच्या स्कूटरचे पुढचे चाकच निखळून पडल्याने कंपनीच्या स्कूटरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
हे वाहन श्रीनाद मेनन या ग्राहकाच्या मालकीचे आहे. मेनन यांनी तुटलेल्या स्कूटरचा फोटो शेअर केला आहे. मेनन यांनी म्हटले की, या गाडीचे पुढच्या चाक अत्यल्प गती असतानाही तुटले आहे. ही बाब धोकादायक आहे. या ट्विटची ओला इलेक्ट्रिकच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत आम्ही त्यांना लवकरच कॉल करू, असे म्हटले आहे. आगीच्या घटनांमुळे १,४४१ स्कूटर्स ओलाने माघारी बोलवल्या होत्या.