दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:02 PM2022-10-10T19:02:24+5:302022-10-10T19:04:03+5:30

Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो.

wework company announced 10 days diwali vacation in festive season | दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा!

दिवाळीला १० दिवसांची सुट्टी देतेय 'ही' कंपनी, बॉस म्हणाला...खूप काम केलं, आता कुटुंबासोबत मजा करा!

Next

Diwali Vacation: देशभरात सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि या सणासुदीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असते, पण कामाचा ताण त्यांच्या योजनेत मोठा अडथळा ठरतो. ही समस्या लक्षात घेऊन, यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर WeWork च्या चीफ पीपल एंड कल्चर ऑफिसर प्रीती शेट्टी यांनी त्यांच्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण १० दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची संपूर्ण दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करा, असं कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. 

"ब्रँड म्हणून आमचे यश हे कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. १० दिवसांचा दिवाळी ब्रेक प्रत्येक WeWork कर्मचार्‍यांना त्यांच्या व्यग्र जीवनातून काही हास्याचे आणि मनोरंजनाचे क्षण देईल", असं प्रीती शेट्टी म्हणाल्या. या सणासुदीच्या हंगामात, न्यूयॉर्क स्थित ऑफिस स्पेस प्रोव्हायडर WeWork ने आपल्या भारतीय कर्मचार्‍यांना एक मोठी आणि अनोखी दिवाळी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा ब्रेक देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. या अंतर्गत कर्मचारी आपले काम बंद करून आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करू शकतील असे सांगण्यात आले आहे. हे आपल्या कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देत घेण्यात आलेला निर्णय आहे.

कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि कंपनीप्रती निष्ठा वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे WeWork कंपनीचे म्हणणे आहे. कर्मचार्‍यांना व्यग्र दिनचर्येतून विश्रांती देणे आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. वी-वर्कच्या मते, एम्प्लॉई फर्स्ट या संकल्पनेखाली अशी पॉलिसी 2021 मध्ये पहिल्यांदा आणली गेली होती.

2022 मध्ये व्यवसाय मजबूत झाला
कंपनीच्या चीफ पीपल आणि कल्चर ऑफिसर प्रीती शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतचे 2022 हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण आमचा व्यवसाय मजबूत झाला आहे. ब्रँड म्हणून आमचे यश हे आमच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. 10 दिवसांची दिवाळी सुट्टी म्हणजे WeWork कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कामासाठी केलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. 

Meesho नेही दिली ११ दिवसांची सुट्टी
एका अहवालानुसार, WeWork ची NCR, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबादमधील ४० ठिकाणी ५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी नुकतीच ऑनलाइन शॉपिंग साइट 'मीशो'नेही आपल्या कर्मचाऱ्यांना अशी बंपर ऑफर दिली होती. 'मीशो'ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत 11 दिवसांचा 'रीसेट आणि रिचार्ज' ब्रेक जाहीर केला आहे.

Web Title: wework company announced 10 days diwali vacation in festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.