कुजबूज--11 ऑगस्ट

By admin | Published: August 11, 2015 11:45 PM2015-08-11T23:45:10+5:302015-08-11T23:45:10+5:30

एलिनांना डच्चू ?

Whack - 11th August | कुजबूज--11 ऑगस्ट

कुजबूज--11 ऑगस्ट

Next
िनांना डच्चू ?
...............
कुंकळ्ळीचे आमदार राजन ऊर्फ सुभाष नाईक यांना दक्षिण गोवा पीडीएच्या चेअरमनपदाचा सरकारने राजीनामा द्यायला लावला. त्याजागी काँग्रेसचे आमदार माविन गुदिन्हो यांची नियुक्ती सरकारने केली. काँग्रेसमध्ये सगळे भ्रष्ट नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही सांगितले. माविनना तर कोर्टाने भ्रष्ट ठरविलेले नाही, असेही तेंडुलकर म्हणाले. (लोक सगळे ऐकत आहेत). आता यापुढे वनमंत्री एलिना साल्ढाणा यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. मग मंत्रिमंडळातील ते रिक्त पद एखाद्या काँग्रेस आमदारालाच दिले जाईल काय, असा प्रश्न कुणीही विचारू शकतो. (कारण काँग्रेसमध्ये माविनसारखे आणखीही पात्र व ‘स्वच्छ’ आमदार आहेत). मात्र तसे नाही. त्या रिक्त पदावर कुणा अपक्षाची देखील नियुक्ती केली जाणार नाही. तिथे साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांना बसविले जाईल. मग साधनसुविधा महामंडळाचे पूर्ण मैदान पणजीच्या आमदारास मोकळे.
.......................
कंपनीचे हात वर
वास्कोत काही वर्षांपूर्वी नाफ्ता दुर्घटना गाजली होती. त्या दुर्घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना अजून पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे आमदार कालरुस आल्मेदा यांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबतचा प्रश्न मंगळवारी विधानसभेत मांडला. झुआरी कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. त्या दुर्घटनेशीसंबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर होण्यासाठी पोलिसांनी चार वर्षे लावली, असे आल्मेदा यांनी नेमकेपणाने नमूद केले. विलंब झाला हे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मान्य केले. आता नुकसान भरपाईच्या विषयाबाबत आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. नुकसान भरपाईबाबत त्या कंपनीने आता हात वर केले आहेत याची कल्पना सभापती आर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. ((((((((((((आर्लेकर हेही वास्कोचे असल्याने)))))))) त्यांना नाफ्ता प्रकरणाबाबत माहिती आहे.
..............

Web Title: Whack - 11th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.