अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:58 AM2024-08-22T06:58:58+5:302024-08-22T06:59:23+5:30

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

What about oppressive leaders? There are 151 cases of torture and 16 cases of rape | अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे

अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे

नवी दिल्ली : देशातील १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल असून, यात पश्चिम बंगालमधील सर्वाधिक खासदार आणि आमदार असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

एडीआरने २०१९ ते २०२४ दरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या ४,८०९ प्रतिज्ञापत्रांपैकी ४,६९३ तपासली. त्यानंतर संबंधित १६ खासदार आणि १३५ आमदारांची माहिती समोर आली. 
हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि ठाण्याच्या मुलींवरील अत्याचाराबाबत देशभरात निदर्शने होत आहेत.

१० वर्षांची शिक्षा ? 
१६ विद्यमान खासदार आणि आमदार असे आहेत ज्यांच्यावर आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराशी संबंधित प्रकरणे नोंदवली आहेत, यात किमान १० वर्षांची शिक्षा आहे.

पुन्हा तिकीट देणार का? 
राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना, विशेषत: बलात्कार आणि महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्यांना तिकीट देण्यापासून परावृत्त करावे. पोलिसांकडून कसून तपास व्हावा, अशी मागणी एडीआरने केली आहे.

पक्षनिहाय अत्याचाराचे गुन्हे असणारे नेते 
भाजप    ५४ 
काँग्रेस    २३ 
टीडीपी    १७ 
आप    १३ 
तृणमूल काँग्रेस     १० 
अपक्ष    ६
राष्ट्रवादी काँग्रेस    १
रासप    १
प्रहार जनशक्ती पार्टी    १

Web Title: What about oppressive leaders? There are 151 cases of torture and 16 cases of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.