"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:38 AM2024-12-04T10:38:33+5:302024-12-04T10:40:41+5:30

विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. 

What about the written promise given to farmers by the Agriculture Minister?; Vice President Dhankad hits out at the modi government | "कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

Jagdeep Dhankhar News: "आता शेतकऱ्यांचं एकच काम राहिले आहे. त्याला मर्यादित करून टाकलं आहे. एकतर शेतात धान्य पिकवा आणि त्याला योग्य दर मिळवण्यासाठी सोसत रहा. आपण फॉर्म्युल्याची अंमलबजावणी का करत नाही, हे मला कळत नाहीये", असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मोदी सरकार आणि कृषी मंत्र्यांचे कान पिळले. 

मोबदला सोडा, थकीत पैसैही दिले जात नाहीये -धनकड

एका कार्यक्रमात बोलताना जगदीप धनकड म्हणाले, "अर्थशास्त्रज्ञ, थिंक टँकसोबत फॉर्म्युला अंमलबजावणीबद्दल चर्चा का करत नाही. आपण शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला पाहिजे. पण, आम्ही तर चांगला मोबदला सोडा, त्याचे थकीत पैसेही देत नाहीये. त्यातही कंजूषपणा करत आहोत. ज्याची तरतूद केली गेली आहे. आणि मला समजत नाहीये की, शेतकऱ्यांशी चर्चा का केली जात नाहीये", अशा शब्दात धनकड यांनी सरकारला खडेबोल सुनावले.


 
उपराष्ट्रपती धनकड म्हणाले, "समजून चला की तुम्ही रस्ता भरकटला आहात. आपण त्या रस्त्यावर गेला आहात, जो खतरनाक आहे आणि माझं म्हणणं आहे की, याचं समाधान करण्याचा उपाय पंतप्रधानांनी सांगितला आहे की, चर्चा झाली पाहिजे." 

"मला खूप चांगलं वाटलं की, जगजीत सिंह यांनी जाहीरपणे माहिती घेतली की मी काय म्हणालो? त्यानंतर त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या की, शेतकऱ्याला हमीभाव देणारा कायदा पाहिजे. उदार मनाने बघा. उदार मनाने विचार करा", अशा शब्दात धनकड यांनी सरकारचे कान टोचले. 

लेखी वचनाचे काय झालं, उपराष्ट्रपतींचा कृषीमंत्र्यांना सवाल

"समजून घ्या. देण्याचे काय फायदे आणि न देण्याचे काय नुकसान आहे. तुम्हाला कळेल यात नुकसानच नुकसान आहे. दुसरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?", असा सवाल करत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोंडीत पकडलं.

Web Title: What about the written promise given to farmers by the Agriculture Minister?; Vice President Dhankad hits out at the modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.