‘घुसखोरांवर काय कारवाई झाली?’; खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 02:56 AM2021-02-07T02:56:51+5:302021-02-07T02:57:11+5:30

मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला.

‘What action was taken against the intruders?’; Question from MP Gopal Shetty | ‘घुसखोरांवर काय कारवाई झाली?’; खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रश्न

‘घुसखोरांवर काय कारवाई झाली?’; खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रश्न

Next

मुंबई : देशात अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिक संबंधी काय  कार्यवाही झाली व त्यासंबंधी लूक आउट सरकुलर/नोटीस (एलोसी) बजवली आहे की नाही? असा सवाल उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकताच लोकसभेत एका तारांकित प्रश्नांद्वारे गृहमंत्रालयाला विचारला.

मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला. केंद्रीय गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी तारांकित प्रश्न संदर्भात उत्तर दिले की, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२०पर्यंत अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एकूण ४०,७३५ लूकआउट सर्कुलर बजविले आहेत. यामध्ये ५१२ लुकआउट सर्कुलर  ठराविक वेळ संपल्यानंतर ही भारतात थांबलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध बजावले गेले आहे. 

 एप्रिल २०२०मध्ये विदेशी नागरिकविरुद्ध २६२७ लूकआउट नोटीस दिल्याची  माहिती मंत्र्यांनी दिली. लूकआउट नोटीस बजावण्यात आलेल्या विदेशी नागरिक भारत बाहेर जाताना त्यांच्या "इमिग्रेशन चेक पोस्ट"वर माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 
 

Web Title: ‘What action was taken against the intruders?’; Question from MP Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.