भारतामध्ये अराजकता आहे की काय? शत्रुघ्न सिन्हा; सत्य उघड करणा-यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:09 AM2018-01-09T00:09:28+5:302018-01-09T00:09:37+5:30

आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणा-या रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला.

What is anarchy in India? Shatrughan Sinha; Badge on those who reveal the truth | भारतामध्ये अराजकता आहे की काय? शत्रुघ्न सिन्हा; सत्य उघड करणा-यांवर बडगा

भारतामध्ये अराजकता आहे की काय? शत्रुघ्न सिन्हा; सत्य उघड करणा-यांवर बडगा

googlenewsNext

नवी दिल्ली : आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणाºया रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला. त्यावर सिन्हा यांनी आगपाखड केली आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘आधारबाबतीत वस्तुस्थिती उघड करणाºया पत्रकारविरोधात केलेली कारवाई पाहता देशात अराजकता असल्याचेच लक्षण आहे.’

पत्रकारांची टीका
ही वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका पत्रकारांच्या अनेक संघटनांनी केली. एडिटर्स गिल्डने म्हटले आहे की, जनहिताच्या दृष्टीने शोधपत्रकारिता करून सत्य उघडकीस आणणाºया वर्तमानपत्र व त्याच्या पत्रकाराविरोधात एफआयआर दाखल करण्याची कृती ही अन्याय्य व वृत्तपत्रस्वातंत्र्यावर थेट हल्ला चढविणारी आहे. रचना खैरा यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर त्वरित रद्द करावा.

Web Title: What is anarchy in India? Shatrughan Sinha; Badge on those who reveal the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.