बेनामी मालमत्ता म्हणजे काय? काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

By Admin | Published: November 15, 2016 01:54 AM2016-11-15T01:54:26+5:302016-11-15T01:54:26+5:30

नोटा बंदी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेनामी मालमत्तांवर टाच आणणार आहेत. मोदी यांनी रविवारी गोव्यात यासंबंधीची घोषणा केली. नवा बेनामी कायदा १ नोव्हेंबरपासून आमलात आला आहे.

What is Anonymous Property? Some questions and their answers | बेनामी मालमत्ता म्हणजे काय? काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बेनामी मालमत्ता म्हणजे काय? काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

googlenewsNext

नोटा बंदी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेनामी मालमत्तांवर टाच आणणार आहेत. मोदी यांनी रविवारी गोव्यात यासंबंधीची घोषणा केली. नवा बेनामी कायदा १ नोव्हेंबरपासून आमलात आला आहे. बेनामी मालमत्ता धारण करणारास ७ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद त्यात आहे. दंड न भरल्यास आणखी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यासंबंधीची ही थोडक्यात माहिती.


बेनामी मालमत्ता म्हणजे?
दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता म्हणजे बेनामी मालमत्ता होय. ज्याच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते, त्याला बेनामदार म्हणतात. जो मालमत्तेचे पैसे दतो, तो तिचा खरा मालक असतो.


बेनामी व्यवहार म्हणजे?                                                                                                                                       बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार, ज्यात मालमत्ता ज्याचे नावे रजिस्टर केली जाते, ती व्यक्ती त्या व्यवहाराचे पैसे देत नाही. कोणी तरी दुसरीच व्यक्ती त्याचे पैसे अदा करते. अन्य कोणाच्या तरी फायद्यासाठी दुसराच कोणी तरी हे व्यवहार करीत असतो.


कोणते व्यवहार बेनामी नाहीत?
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून पत्नी अथवा मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता.
भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईकांच्या नावे घेतलेली अशी मालमत्ता जिची किंमत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून अदा करण्यात आलेली आहे.
कुळांच्या नावे घेतलेली, पण या व्यवहारात विश्वस्त अथवा लाभधारक असलेली मालमत्ता.


बेनामी मालमत्तेत कोणकोणत्या मालमत्ता येतात?
-ज्ञात स्रोताबाह्य उत्पन्नातून पत्नी व मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता.
- भाऊ अथवा बहिणींसोबत भागिदारीत घेतलेली अज्ञात स्रोतांच्या पैशांतील मालमत्ता.
-कुळांच्या नावे घेतलेली मालमत्ता. याचा अर्थ असा होतो की, कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावे मालमत्ता घेतली असेल, तर तीही बेनामी मालमत्ता होऊ शकते.

कोणते व्यवहार बेनामी?
चल-अचल संपत्ती, कुठल्याही प्रकारचे हक्क अथवा हित, कायदेशीर दस्तावेज, सोने, वित्तीय रोखे इ. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीसाठी केलेले सर्व व्यवहार बेनामी व्यवहारात येतात.

काय परिणाम होईल?
सामान्य नागरिकांना, तसेच चोख व्यवहार असलेल्यांना याचा काहीही त्रास होणार नाही. काळ्या पैशातून कमावलेल्या बेकायदेशीर मालमत्ताधारकांसाठी मात्र येणारा काळ वाईट असेल.

Web Title: What is Anonymous Property? Some questions and their answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.