मोदींच्या दौऱ्यांचा काय लाभ -काँग्रेस
By Admin | Published: September 23, 2015 10:22 PM2015-09-23T22:22:54+5:302015-09-23T22:22:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सात दिवसांच्या आयर्लंड आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले असतानाच, मोदींच्या अशा नेहमीच्या विदेश दौऱ्यांपासून देशाचा कोणता फायदा झाला आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सात दिवसांच्या आयर्लंड आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले असतानाच, मोदींच्या अशा नेहमीच्या विदेश दौऱ्यांपासून देशाचा कोणता फायदा झाला आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
‘पंतप्रधान अनेक देशांचा दौरा करतात; परंतु त्यांच्या या दौऱ्याचा भारताला क्वचितच फायदा होतो,’ असे काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग म्हणाले. पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीपूर्वी बोर्इंग या अमेरिकन संरक्षण कंपनीसोबत झालेल्या ३.१ अब्ज डॉलर्सच्या कराराचा उल्लेख करून सिंग म्हणाले, ‘मोदींच्या विदेश दौऱ्यामुळे त्यांच्या बहुचर्चित ‘मेक इन इंडिया’चा नव्हे तर ‘मेक इन अमेरिके’चाच मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)