एक्झिट पोलचे आकडे कितपत ठरतात खरे? काय सांगतात गेल्या 5 निवडणुकीतले आकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 06:10 PM2019-05-19T18:10:50+5:302019-05-19T18:40:36+5:30

मागील 5 निवडणुकीतील निकालांचा इतिहास पाहता हे अंदाज खरे ठरले का? याची माहिती आकडेवारीतून समोर येते. 

What are the numbers of exit poll real? What are the numbers in the last 5 elections? | एक्झिट पोलचे आकडे कितपत ठरतात खरे? काय सांगतात गेल्या 5 निवडणुकीतले आकडे?

एक्झिट पोलचे आकडे कितपत ठरतात खरे? काय सांगतात गेल्या 5 निवडणुकीतले आकडे?

Next

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरु असलेला लोकसभा निवडणुकीचा संग्राम अखेर संपला आहे. त्यामुळे 23 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र त्याआधी अनेक खाजगी संस्थांनी केलेले सर्व्हे विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले जातात. मात्र नेमके हे अंदाज कितपत खरे ठरतात याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे मागील 5 निवडणुकीतील निकालांचा इतिहास पाहता हे अंदाज खरे ठरले का? याची माहिती आकडेवारीतून समोर येते. 

1998 च्या निवडणुकीत वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लागलेला निकाल हा आकडेवारीच्या सरासरी जवळपास पोहचलेला दिसतो.  

1998 लोकसभा निवडणूक
1998BJP+Congress+Others 
Outlook/AC Nilesan238149156
DRS249155139
Frontline/CMS235155182
India Today/CSDS214164165
Official Results 252166119

 

1999 च्या निवडणुकीत वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लागलेला निकाल यातील तफावत पाहता आकडेवारीत भाजपाला जास्त जागा देण्यात आल्या मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात भाजपाला कमी जागा मिळाल्या. 

1999 लोकसभा निवडणूक
1999BJP+Congress+Others 
India Today/Insight33614680 
HT-AC Nielsen30014695
Outlook/CMS32914539
Timespoll/DRS332138N/A
Official Results 296134113

   

2004 च्या निवडणुकीत वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लागलेला निकाल यामध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा दाखविण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात भाजपाला निकालात कमी जागा जिंकता आल्या. 

2004 लोकसभा निवडणूक
2004BJP+Congress+Others 
Outlook-MDRA29016999
AajTak-ORG Marg248190105
NDTV/Indian Express250205120
Star/C-voters27518698 
Official Results 169 222132

 

2009 च्या निवडणुकीत वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लागलेला निकाल यातील आकडेवारी जवळपास सरासरी राहिली असं म्हणता येईल. 

2009 लोकसभा निवडणूक
2009 BJP+Congress+Others
Star News/AC Nielsen197199136
Times Now183198162
NDTV177216150 
Headline Today 180191172
Official Results 159 26279

 

2014 च्या निवडणुकीत वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लागलेला निकाल याची आकडेवारी पाहता माध्यमांनी केलेला सर्व्हे अंदाज खरा ठरलेला दिसतो. 

2014 लोकसभा निवडणूक
2014BJP+Congress+Others 
ABP Nielsen 28197165
Times Now-ORG249148146
CNN-IBN CSDS Lokniti28097166
Headlines Today Cicero272115156
Chanakya34070133
India TV- C-voters 289101153
NDTV 279103161
Official Results28244217

 

एकंदर मागील निवडणुकीच्या एक्झिट पोलचा इतिहास बघितला तर यंदाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाचं सरकार येणार याचा अंदाज सरासरी आकडेवारीच्या जवळपास पोहचू शकेल असचं चित्र दिसू शकतं. 

Web Title: What are the numbers of exit poll real? What are the numbers in the last 5 elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.