चंद्रावर दिसणाऱ्या 'या' लाल आणि निळ्या खुणा कशाच्या? प्रज्ञान रोव्हरनं पाठवलाय अनोखा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:54 PM2023-09-05T19:54:23+5:302023-09-05T19:55:07+5:30
Moon Surface in Red and blue Color : या 14 दिवसांत रोव्हरने चंद्रावर अनेक महत्वाच्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. तसेच दुर्मिळ छायाचित्रही पाठविली आहेत.
चंद्रयान-3 चांद्राच्या दक्षिणी ध्रुवावर यशस्वीपणे लँड होऊन 15 दिवस झाले आहेत. विक्रम लॅडरमधून बाहेर पडून प्रज्ञान रोव्हरने 14 दिवसांत चांद्राच्या पृष्ट भागाचे बारकाईने अध्ययन केले. मात्र आता चंद्रावर रात्र झाल्याने मायनस 280 डिग्री तापमानावर रोव्हर विक्रम लँडरच्या आत आराम करत आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रोव्हची बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे आणि 14 दिवसांनंतर, रोव्हरचा चंद्रावरील प्रवास पुन्हा एकदा सुरू होईल.
या 14 दिवसांत रोव्हरने चंद्रावर अनेक महत्वाच्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. तसेच दुर्मिळ छायाचित्रही पाठविली आहेत. आता इस्रोने प्रग्यान रोव्हरने पाठवलेले नवीन छायाचित्र नव्या आणि अनोख्या स्वरुपात सादर केले आहेत. या चित्रात चंद्राचा पृष्ठभाग लाल आणि निळा दिसत आहे.
इस्रोने मंगळवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी X वर एक फोटो पोस्ट केला आहे. यात इस्रोने प्रज्ञान रोव्हरने पाठवलेला 30 ऑगस्टचा फोटो री-पोस्ट केला आहे. या पोस्टसह ISRO ने माहिती दिली आहे की, हा फटो अॅनाग्लिफ स्टिरिओ अथवा मल्टी-व्ह्यू इमेजमधून तीन आयामांमध्ये वस्तू अथवा प्रदेशाचे एक साधे दृश्य आहे.
हा फोटो अॅनाग्लिफ NavCam स्टिरिओ इमेजचा वापर करून तयार करण्यात आला आहे. यात प्रज्ञान रोव्हरने टीपलेले छायाचित्र आहे. इस्रोनुसार, डावा फोटो लाल चॅनेलमध्ये ठेवला आहे, तर उजवा फोटो निळ्या आणि हिरव्या चॅनलमध्ये ठेवला आहे. या दोन फोटोंमधील फरक, स्टिरीओ इफेक्ट आहे, जो तीन आयामांचे दृश्य परिणाम दर्शवतो.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) September 5, 2023
Anaglyph is a simple visualization of the object or terrain in three dimensions from stereo or multi-view images.
The Anaglyph presented here is created using NavCam Stereo Images, which consist of both a left and right image captured onboard the Pragyan… pic.twitter.com/T8ksnvrovA
महत्वाचे म्हणजे, प्रज्ञान रोव्हरला बसवण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा NavCam हा LEOS/ISRO ने विकसित केला आहे. याची डेटा प्रोसेसिंग इस्रो द्वारे केली जात आहे.