पाणी योजनांवर कोट्यवधीचा खर्च तरी टँकर का? जलव्यवस्थापन समितीची सभा : जि.प.सदस्यांनी विचारला यांना जाब
By Admin | Published: June 2, 2016 10:20 PM2016-06-02T22:20:37+5:302016-06-02T22:20:37+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.
ज गाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सानेगुरुजी सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, कृषि सभापती मिना पाटील, समाज कल्याण सभापती दर्शना घोडेस्वार, सदस्य पूनम पाटील, डॉ.उध्दव पाटील, रुपाली चोपडे, सीईओ अस्तिककुमार पांडेय, ग्रा.पं विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मीनल कुंटे, राजन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. उध्दव पाटील यांनी नवीन पंपिग मशिन घेतल्या आहेत. पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे पाईप वारंवार फुटतात. त्यामुळे नवीन पाईप लाईनच्या निधीसाठी मागणी केली. यावेळी मागील सभेतील ठरावांवरील पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपविभागीय कामकाजाचा, सामुदायिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत वसुलीचा व खर्चाचा आढावा, जि.प.च्या लघुसिंचन विभाग व उपविभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत साठवण बंधारे, सिमेंट नाला बांधणे, पाझर तलाव दुरुस्ती, साठवण बंधारे दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर आयत्या वेळी येणार्या विषयांना मान्यता देण्यात आली. त्यात भडगाव तालुक्यातील बोरनार पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख ५४ हजार, पारोळा तालुक्यातील वंजारी बोदडे पाणी पुरवठा योजनेसाठी व पीव्हीसी पाईपलाईनसाठी ८ लाख ५२ हजार, अमळनेर तालुक्यातील जळोद येथील जलकुंभ व पीव्हीसी पाईपलाईन दुरुस्ती व देखभालसाठी १५ लाख ८१ हजार रुपये तर रावेर तालुक्यातील गहुखेडा व इतर पाच गावांच्या जलशुध्दीकरण दुरुस्तीच्या कामासाठी २२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. हगणदारीमुक्तीसाठी डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दोन गावे घेतली. प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.