१५ ऑगस्टला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? सोशल मीडियावर झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:29 AM2023-08-15T11:29:03+5:302023-08-15T11:30:43+5:30
बागेश्वर शास्त्री हे आज सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या शैली आणि वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आज त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यांना ट्रोलही करत आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्ताने ते हैदराबादमध्ये तिरंगा यात्रा काढण्याची माहिती देत होते. यावेळी बोलताना त्यांनी १५ ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन असल्याचे सांगितले. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय?
ते सांगत होते, भगवान सीता राम यांच्या कृपेने प्रजासत्ताक दिन 2023 च्या शुभ मुहूर्तावर, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बेगमबाजार, छत्री, भाग्यनगर, हैदराबाद येथे तिरंगा यात्रा काढली जात आहे, माझे लाडके लाडू यादव आणि त्यांचे सैन्य. त्यात आम्ही तासाभराने येत आहोत. 15 ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन म्हणून बोलला गेला ही त्यांची चूक होती. तर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने म्हटले की, ते हिंदु राष्ट्राविषयी बोलतात आणि १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आहे हे माहीत नाही. तर एकाने, फॉर्म चुकीचा आला असावा. अनेकांनी धीरेंद्र शास्त्री यांची बाजू घेत अशी मानवी चूक कुणाकडूनही होऊ शकते.
भगतसिंग युवा सेनेचे अध्यक्ष लड्डू सिंह सांगतात की, दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रा काढली जाते. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री झेंडा दाखवतील. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अनेकदा त्यांच्या व्यासपीठावरून हिंदू राष्ट्राबद्दल बोलतात. अलीकडेच काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातल्या विरोधाचा सामना करावा लागला होता.