मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ? - कपिल सिब्बल
By admin | Published: November 15, 2016 04:35 PM2016-11-15T16:35:46+5:302016-11-15T16:35:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शेतक-यांकडे पैसा नसतानाही सरकार गरीब सुखी असल्याचं सांगत आहे. मोदींनी गरिबांकडे बघण्याचा चष्मा बदलण्याची गरज असल्याचं मतही सिब्बल यांनी व्यक्त केलं.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी शांतपणे झोपत आहेत, गरीब जनता नाही. एटीएमला 2500ची मर्यादा ठेवली आहे. मात्र एटीएममधून 2 हजारची नोटच येत नाही. तसेच तामिळनाडूमध्ये नोटबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना पगारच मिळत नाही, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली आहे. भारताच्या बाहेर असलेला 80 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा 100 दिवसांत स्वदेशी आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, असाही सवाल सिब्बल यांनी मोदींना विचारला आहे.
जपानच्या दौ-यावर असताना लोकांना काही दिवस त्रास सहन करावा लागेल असं मोदी म्हणाले होते. आता मात्र सर्व परिस्थिती सुरळीत होण्यासाठी अजून 50 दिवस लागतील असं सांगत आहेत. लोकांच्या त्रासाकडे मोदी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.
The arrogance with which PM spoke in Japan, shows that he is distanced from the hardships of people: Kapil Sibal #DeMonetisationpic.twitter.com/jqEjfeUzSX
— ANI (@ANI_news) 15 November 2016