'काय फरक पडतो', चीन-रशियाचे राष्ट्राध्यक्ष जी २० ला येत नसल्यावरून जयशंकर यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:38 AM2023-09-06T09:38:31+5:302023-09-06T09:39:07+5:30
रशियाकडून परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव येणार आहेत. तर चीनकडून पंतप्रधान ली कियांग भारतात येणार आहेत.
दिल्लीत जी २० परिषद होत आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एवढ्या दुरून येत आहेत. परंतू, भारताचे सख्खे शेजारी असलेल्या रशिया आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष येत नाहीएत. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यामुळे काहीही फरक पडत नाही, असे म्हटले आहे.
रशियाकडून परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव येणार आहेत. तर चीनकडून पंतप्रधान ली कियांग भारतात येणार आहेत. यावर जयशंकर यांनी ही काही पहिलीच वेळ नाहीय की जी २० परिषदेत राष्ट्राध्यक्ष आले नसतील, असे म्हटले आहे.
G-20 मध्ये अनेकदा राष्ट्र प्रमुखांऐवजी दुसरे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आले आहेत. यामुळे काही फरक पडत नाही. देशाचे मत, स्थिती काय आहे हे महत्त्वाचे आहे. मला वाटते की G-20 मधील प्रत्येकजण खूप गंभीरपणे येत आहेत, असे जयशंकर म्हणाले.
दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग का येत नाहीएत यावर चीनने स्पष्टीकरण दिले आहे. चीनचे पंतप्रधान ली चियांग भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत देशाचे नेतृत्व करतील. G-20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये चीनचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. या G-20 शिखर परिषदेत ली चियांग चीनची बाजू आणि प्रस्ताव मांडणार आहेत. सर्व पक्षांसोबत मिळून आम्ही G-20 यशस्वी करण्यासाठी तयार आहोत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले आहे. शी जिनपिंग भारतात न येण्यामागचे कारण त्यांनी सांगितले नाही.