सायबर हल्ला रोखण्यासाठी काय करावे

By Admin | Published: May 16, 2017 12:02 AM2017-05-16T00:02:49+5:302017-05-16T00:40:41+5:30

जगभरातील अनेक देशांमध्ये सायबर हल्ला झाला असल्यामुळे संगणक आणि लँपटॉपवर होणा-या रँनसमवेअर अट्ँकची धास्ती कंपन्यांनी घेतली आहे.

What to do to prevent cyber attacks | सायबर हल्ला रोखण्यासाठी काय करावे

सायबर हल्ला रोखण्यासाठी काय करावे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - जगभरातील अनेक देशांमध्ये सायबर हल्ला झाला असल्यामुळे संगणक आणि लँपटॉपवर होणा-या रँनसमवेअर अट्ँकची धास्ती कंपन्यांनी घेतली आहे. हा हल्ला टाळण्यासाठी आपल्या संपर्क यादीतील लोकांकडून येणारे अनपेक्षित ईमेल/लिंक/युआरएल वर क्लिक करू नका, आपल्या संगणकावर व्हायरस आढळून आल्यास संगणक किंवा लँपटॉप नेटवर्क पासून बाजूला करा तसेच मायक्रोसॉफ्ट आॅफिसमधील Macros  हे नेहमी इनअँक्टिव्ह ठेवा असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहरच्या वतीने करण्यात आली आहे.

संगणक किंवा लँपटॉप सुरू करताना एक मेसेज दिसायला लागतो की आम्ही तुमचा संगणक/लँपटॉप हँक केला असून, तुमचा संपूर्ण डाटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शन ला क्लिक करून ठरावीक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यावर दिलेल्या वेळेत जमा करावी अन्यथाा तुमचा सर्व डाटा एनक्रिप्ट करण्यात येईल. तुमच्या स्क्रिनवर एका बाजूला रक्कम जमा करण्यासाठी दिलेल्या वेळेचा काऊंटडाऊन चालू झालेला दिसतो. संगणक/लँपटॉपचा सर्व ताबा हँकर्सने घेतलेला असतो. या स्क्रिनवर दिलेल्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक/ लँपटॉप चालू होत नाही व कोणतीही आॅपरेटिंग सिस्टीम चालू होत नाही. या सायबर गुन्हेगारीला रँनसमवेअर अट्ँक असे म्हणतात. यामध्ये कोणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणावरून तुमचा संगणक किंवा लँपटॉप मधील डाटा (इनक्रिप्ट) हँक करून त्यासाठी डिस्क्रिप्शन फी’ साठी पैशाची मागणी करतो अर्थात तो खंडणीची मागणी करीत असतो. यासाठी कोणतीही लिंक ओपन करू नका. ही बाब केवळ Windows XPके या आॅपरेटिंग सिस्टीम असलेल्या संगणक मोबाईल आणि लँपटॉप अशा अन्य डिव्हाईस्वरच होत असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहरचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
 
काय करू नये ( वैयक्तिक-संस्थात्मक)
* अँंटीवायरस ने आपली सिस्टीम नेहमी अदयावत ठेवा
* स्पँम ब्लॉक ही यंत्रणा नेहमी अँक्टिव्ह ठेवा.
* आपला महत्वाचा डेटा स्वतंत्र उपकरणावरती जतन करून ठेवावा.
* मायक्रोसॉफ्ट आॅफिसमधील Macros  नेहमी इनअँक्टिव्ह ठेवा.
संस्थात्मक
* तुमचे नेटवर्क इंफ्रास्ट्रकचर फायरवॉल असणे अत्यंत महत्वाचे आहे.
* एसपीएफ, डीएमएआरसी, डीकेआयएम या प्रणालीचा वापर करावा.जेणेकरून ईमेलद्वारे होणा-या रँनसमवेअर व्हायरसचा अट्ँक आपल्या ईमेल बॉक्समध्ये प्रवेश करणार नाही.
* नेटवर्कवरती वेब आणि ईमेल फिल्टरवरची व ईमेल सोबत असणा-या अँटँचमेंट सुद्धा फिल्टर करण्याची उपकरणे तसेच सॉफ्टवेअर कॉन्फिगर करावे. 
रँनसमवेअर सायबर हल्ल्याचा शिकार ठरलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून, सायबर सुरक्षा तज्ञ 16 व 17 मे रोजी 02536631777 या हेल्पलाईन क्रमांकावर सहकार्यासाठी उपलब्ध राहाणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी दिली.

Web Title: What to do to prevent cyber attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.