काय सांगता? 1 किलो मिठाईची किंमत 50 हजार, तरीही खरेदीला गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 04:59 PM2021-11-03T16:59:54+5:302021-11-03T17:04:26+5:30
लखनौच्या एका दुकानात ही मिठाई 50 हजार रुपये किलोने विकली जात आहे. तरीही, या मिठाईचे आकर्षण असून खरेदीसठी गर्दी होताना दिसत आहे. मिठाई एवढी महाग असतानाही लोकांमध्ये या मिठाईची क्रेझ पाहायला मिळत आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका खास मिठाईची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मिठाईच्या चर्चेची अनेक कारणे आहेत. त्यापैकी, मिठाईची चव आणि किंमत या दोन्ही बाबींवर मोठी चर्चा होत आहे. मात्र, या मिठाईची चव घेणं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचं आहे, कारण या मिठाईचा एक पीस (तुकडा) खाण्यासाठी तुम्हाला 500 रुपयांची नोट मोडावी लागणार आहे.
लखनौच्या एका दुकानात ही मिठाई 50 हजार रुपये किलोने विकली जात आहे. तरीही, या मिठाईचे आकर्षण असून खरेदीसठी गर्दी होताना दिसत आहे. मिठाई एवढी महाग असतानाही लोकांमध्ये या मिठाईची क्रेझ पाहायला मिळत आहे. केवळ शहरातील लोकं नाही, तर ऑनलाईन पाहणी केल्यानंतर विविध राज्यांतून लोकांनी मिठाई बुक केली आहे. महाग असण्याचे कारण म्हणजे ही 'एक्सोटिका 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड मिठाई' आहे. यामध्ये, किन्नौरचे चिलगोजे, काश्मीरी केसर, मॅकडामिया नट्स आणि ब्लू बेरीचा वापर करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश: लखनऊ में एक मिठाई की दुकान पर 50,000 रु. किलो बिक रही गोल्ड प्लेटेड मिठाई लोगों के लिए आकर्षण का केंद्र बनी हुई है।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 2, 2021
दुकानदार ने बताया, "एक्सोटिका 24 कैरेट गोल्ड प्लेटेड मिठाई है। इसमें किन्नौर के चिलगोजे, कश्मीरी केसर, मैकडामिया नट्स, ब्लू बैरी का इस्तेमाल हुआ है।" pic.twitter.com/ArtO1wWJJz
मिठाईचे पॅकींगही खास
मिठाईचं पॅकिंगही खासग शाही अंदाजात करण्यात आलंय. गोल्ड फॉयलमध्ये ही मिठाई बसविण्यात आलीय. अगदी, राजा-महाराजा यांच्या जमान्यातील नजराना दिल्याची आठवण तुम्हाला होईल.