सोशल मीडियावर जीएसटीचा अर्थ काय माहितीये का?

By Admin | Published: July 1, 2017 05:52 AM2017-07-01T05:52:13+5:302017-07-01T06:29:57+5:30

जीएसटीचं अनेकांकडून समर्थन केलं जात आहे पण या जीएसटीमुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीएसटीमुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

What does GST mean on social media? | सोशल मीडियावर जीएसटीचा अर्थ काय माहितीये का?

सोशल मीडियावर जीएसटीचा अर्थ काय माहितीये का?

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीचं अनेकांकडून समर्थन केलं जात आहे पण या जीएसटीमुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीएसटीमुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही जीएसटीबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 
 
गेल्या दोन दिवसांपासून जीएसटी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जीएसटीचा विरोध करणा-यांनी तर याचा अर्थच बदलून टाकला असून जीएसटीचा वेगवेगळा फुलफॉर्म बनवण्याची सोशल मीडियामध्ये जणू शर्यतच सुरू आहे. जीएसटीचा जमेल तसा फुलफॉर्म बनवून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला जात आहे. ""गुड्स अॅंड सर्व्हिस टॅक्स"" ऐवजी अनेकांनी जीएसटी म्हणजे ""ग्रेट स्टुपिड टॅक्स"" अशा शब्दांमध्ये जीएसटीची खिल्ली उडवली जात आहे. पण यासोबतच जीएसटीचं समर्थन करणा-यांचीही कमी नाही. विरोध करणा-यांना जीएसटीचे समर्थक आपल्या भाषेत चोख उत्तर देत आहेत. सोशल मीडियावर जीएसटीचे विरोधक आणि समर्थक यांच्यात सोशल युद्ध सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 
 
एक नजर सोशल मीडियातील काही प्रतिक्रियांवर- 
* GST की वजह से तो इन्द्र भगवान भी कन्फ्यूज है। वो भी सोच रहे है कि बारिश 30 जून के बाद 28% GST लगाकर करूं या पहले..
 
* जिनकी बीबियां मायके गई हैं वो 30 जून तक वापस बुलवा लें वरना 1 जुलाई से 18% LUXURY TAX (GST) लगेगा।
 
* रिपोर्टर ने आलिया भट्ट से पूछा - क्या आपको “GST” के बारे में पता हैं? आलिया भट्ट - Yes,
 
G - Good Night
 
S - Sweet Dream
 
T - Take Care
 
* गर्लफ्रेंड - तुम मुझसे कितना प्यार करते हो,
 
बॉयफ्रेंड - 72%
 
गर्लफ्रेंड - 100% क्यों नही?
 
बॉयफ्रेंड - 28% तो “जीएसटी” हैं न पगली लक्जरी आइटम पर
 

Web Title: What does GST mean on social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.