"आरएसएसला काय करायचं आहे?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:07 IST2025-02-16T15:04:20+5:302025-02-16T15:07:47+5:30

RSS Chief Mohan Bhagwat: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

"What does RSS want to do?"; Sarsanghchalak Mohan Bhagwat gave a one-sentence answer | "आरएसएसला काय करायचं आहे?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

"आरएसएसला काय करायचं आहे?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं एका वाक्यात उत्तर

RSS Mohan Bhagwat News: हिंदूत्व काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भागवत यांनी स्वयंसेवकांना हिंदूत्वाबद्दल मार्गदर्शन केलं. 

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "अनेक अडचणी आल्या असतील, त्या ते अडथळ पार करून सर्वजण उपस्थित आहेत. हा आग्रह का आहे? संघाला (RSS) काय करायचं आहे? एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करू इच्छितो."

आरएसएसला हिंदू समाजाचं संघटन का करायचं?

या मुद्द्यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, "हिंदू समाजाचं संघटन का? कारण या देशाचा उत्तरदायी समाज हिंदू समाज आहे. अमृत वचन तुम्ही ऐकलं. भारतवर्ष हे केवळ भुगोल नाहीये. भुगोल छोटा मोठा होत राहतो. पण, भारत तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्याचा एक स्वभाव असतो. भारताचा एक स्वभा आहे. त्या स्वभावासोबत आपण राहू शकत नाही, असे ज्यांना वाटले, त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला", असे भाष्य सरसंघचालक भागवत यांनी केले. 

भारत-पाक फाळणीवर सरसंघचालकांचं भाष्य

"स्वाभाविक हे आहे की, जे वेगळे झाले नाहीत, त्या सगळ्यांना भारत नावाचा स्वभाव हवा आहे. हा भारत नावाचा स्वभाव आजचा नाहीये. १५ ऑगस्ट १९९४७ नंतर असे नाही. तो त्यापेक्षाही प्राचीन आहे. जेव्हा जगाच्या इतिहासाने डोळे उघडले, त्याने या भूभागावर; ज्याला भुगोलामध्ये इंडो-इराणीय प्लेट म्हणतात, त्या भूभागावर राहणाऱ्या सगळ्यांमध्ये हाच स्वभाव असल्याचे बघितले", असे मोहन भागवत इतिहासातील दाखला देत म्हणाले. 

"तो स्वभाव काय आहे, जगाची विविधता स्विकारून हिंदू वाटचाल करतो. सगळ्यांची आपापली वैशिष्ट्ये असतात. हिंदूंना माहितीये की, ही वैशिष्ट्ये ज्या एका सत्याचा आविष्कार आहे, ते सत्य एकच आहे; सृष्टीच्या चराचरात तेच एक आहे, जे बदलत नाही... जे आधीही होतं, आजही आणि नंतरही राहील. तेच शाश्वत आहे. बाकी सगळं बदलत राहते. तो बदलही त्या एकाची अभिव्यक्ती असते. त्यामुळे हल्ली म्हणतात विविधतेमध्ये एकता! पण हिंदू हे जाणतो. त्याला हे समजते की, एकतेची ही विविधता आहे, वैशिष्ट्ये आहेत", असे मोहन भागवत म्हणाले. 

तोच खरा मोठेपणा असतो -सरसंघाचालक भागवत

"हा एकतेचा शृंगार आहे. त्यामुळे आपापल्या वैशिष्ट्यांसोबत श्रद्धेने चालत रहा. सगळ्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करा. मनुष्याला व्यक्ती म्हणून जगायचं असतं, पण फक्त व्यक्तीच्या नात्याने जगायचं नाही. व्यक्ती कुटुंबासाठी आहे. कुटुंब समाजासाठी आहे. समाज मानवतेसाठी आहे. सर्व जीवन सृष्टीच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत मैत्रही त्या स्वभावात पहिल्यापासूनच आहे. व्यक्ती मोठा की समाज, हा वाद इथे नाहीये. सगळ्यांजवळ आपापली सत्ता आहे, ती सत्ता दुसऱ्यांची सत्ता मोठी करण्यासाठी कामाला आली पाहिजे. आपण मोठे असाल, तर दुसऱ्यांनाही मोठे करा. तोच खरा मोठेपणा आहे", मोहन भागवत म्हणाले.

Web Title: "What does RSS want to do?"; Sarsanghchalak Mohan Bhagwat gave a one-sentence answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.