स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2016 07:28 AM2016-03-09T07:28:16+5:302016-03-09T15:52:47+5:30

सिगारेटची पाकिटे रंगहीन करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे

What is evidence of smoking cancer? Supreme court asks | स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

Next
>
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे. 
 
अलाहाबादमधील वकील उमेश शर्मा यांनी ही याचिका केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन केल्याने त्याचा आकर्षकपणा कमी होईल, त्यामुळे त्यावर देण्यात येणा-या धोक्याच्या सूचनेकडे लक्ष जाईल असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? जे अजिबात धुम्रपान करत नाहीत त्यांना कॅन्सर झाल्याच्या घटना आहेत तर दुसरीकडे धुम्रपान करुन देखील अनेक वर्ष जगणारी लोकदेखील आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्राकडून उत्तरदेखील मागवलं आहे. 
 
याचिकाकर्ते उमेश शर्मा यांना गुटखा आणि धुम्रपानाचं व्यसन आहे. ते सध्या जीभ आणि तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 2020 पर्यंत 1.5 दशलक्ष लोकांचा तंबाखू आणि धुमप्रानाच्या व्यसनामुळे मृत्यू होणार असल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आल्याचं उमेश शर्मा यांनी सांगितलं आहे. 
सध्या तंबाखू उत्पादने आकर्षक पद्धतीने पॅकिंग केली जातात जेणेकरुन तरुणांनी त्यांची खरेदी करावी आणि सेवन करावं. यामुळे पाकिटावर दिलेल्या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष जात नाही. यामुळे तंबाखू उत्पादन करणा-या कंपन्यांना रंगहीन पाकिटे तयार करण्यास सांगण्याची गरज आहे. ज्यावर ब्रॅण्ड कलर, लोगो, ग्राफिक्स नसावेत. रंगहीन पाकिटे असावीत ज्यावर चित्राच्या माध्यमातून किंवा लिखीत धोक्याची सूचना दिली असावी जेणेकरुन लोकांचं त्याकडे लक्ष जाईल आणि त्यांची खरेदी करण्यापासून ते स्वताला रोखतील असं मत उमेश शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. 
 
भारतात तंबाखूचा मुलं आणि तरुणांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतात 15 ते वरील वयोगटामधील 35 टक्के म्हणजे 28 करोड लोक तंबाखूचं सेवन करत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि यातील अनेकजण साक्षर आणि निम-साक्षर आहेत. तंबाखूमुळे होणा-या आजारांवरील उपचारांसाठी 2011मध्ये  104,500 कोटी खर्च करण्यात आला आहे. जो आपल्याचा जीडीपीच्या 1.16% आहे अशी माहिती उमेश शर्मा यांनी दिली आहे. 
प्रभात झा यांनी एका मासिकात लिहिलेल्या अहवालानुसार गेल्या 17 वर्षात विडी-सिगारेट ओढणा-या भारतातल्या पुरुषांची संख्या 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. एका पाहणीत आढळलेल्या माहितीनुसार 1998 मध्ये विडी-सिगारेट ओढणा-या पुरुषांची (15 ते 69 वयोगट) संख्या7.9 कोटी होती, जी 2015 पर्यंत 2.9 कोटींनी म्हणजेच 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. याचा अर्थ भारतामध्ये दरवर्षी स्मोकर्समध्ये सरासरी 17 लाख पुरुषांची भर पडत आहे.2010 मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के किंवा 10 लाख मृत्यू धुम्रपानामुळे झाले होते. यापैकी 70 टक्के मृत्यू 30 ते 69 या वयोगटातील होते.
 

Web Title: What is evidence of smoking cancer? Supreme court asks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.