‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेमके काय झाले?’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 12:23 AM2019-08-19T00:23:08+5:302019-08-19T00:23:18+5:30
तैहोकू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला झालेल्या अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, असे नेताजींच्या कुटुंबियांपैकी काही जण व इतर काही संशोधकांचा दावा आहे.
कोलकाता : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस हे गूढरीत्या गायब झाल्यानंतर त्यांचे पुढे काय झाले, याविषयीची माहिती जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमधील तैहोकू विमानतळावरून उड्डाण केलेले सुभाषचंद्र बोस यांचे विमान बेपत्ता झाले. त्यानंतर नेताजींचे नेमके काय झाले, हे आतापर्यंत कुणालाच ठाऊक नाही. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. तैहोकू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला झालेल्या अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, असे नेताजींच्या कुटुंबियांपैकी काही जण व इतर काही संशोधकांचा दावा आहे. मात्र, या विमानाला अपघात झालाच नव्हता, असेही बोस कुटुंबातील काही जण व अन्य इतिहास संशोधकांना वाटते. (वृत्तसंस्था)