1 एप्रिलपासून काय महाग? काय स्वस्त?

By admin | Published: March 30, 2017 01:21 PM2017-03-30T13:21:46+5:302017-03-30T13:39:13+5:30

नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहेत.

What is expensive from 1st April? What's cheap? | 1 एप्रिलपासून काय महाग? काय स्वस्त?

1 एप्रिलपासून काय महाग? काय स्वस्त?

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आल्याप्रमाणे सर्वप्रकरचे टॅक्स एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या गरजेच्या काही वस्तू महाग होणार आहेत. यामध्ये पान-मसाला, सिगारेट, चांदीच्या वस्तू, हार्डवेअर, स्लिव्हर फॉईल, चांदीचे आभूषणे, स्टीलचे सामान, आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. तर काही वस्तू स्वत होतील. यामध्ये  नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौर उर्जा बॅटरी आणि पॅनल यांचा समावेश आहे. जाणून घेऊत काय स्वत होणार? आणि काय महाग? 


हे महागणार -
- केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क वाढल्यानंतर तंबाखू असणाऱ्या पान-मसाला आणि गुटख्यावर उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे शौकीनांना आता है शौक महाग पडणार आहे. सिगारेटवर उत्पादन शुल्क 215 रुपये प्रति हजारवरून वाढवून 311 रुपये प्रति हजार होणार आहे.
- एक एप्रिलपासून हेल्थ आणि कार इन्शूरन्स महाग होणार आहे.
- मोबाईल फोन तयार करण्यासाठी लागणारे प्रिटेड सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात येणार आहे. यापूर्वी सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता मोबाईल फोन महाग होणार आहेत.
- एलईडी ब्लब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीवर सीमा शुल्क आणि ६ टक्के प्रतिपूर्ती शुल्क लावण्यात येणार आहे. त्यामुळे एलईडी बल्ब महाग होणार आहे.
- अ‍ॅल्यूमिनियम ३० टक्के आयात शुल्क लावण्यात आला आहे. त्यामुळे या संदर्भात सर्व पदार्थ महाग होणार आहे.
- कार, मोटारसायकल आणि कमर्शियल वाहनांच्या विमा एक एप्रिलपासून महाग होणार आहे. यांच्या दरात 50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

हे स्वस्त होणार
- रेल्वे तिकीट खरेदी, स्वस्त घर, मध्यम वर्गाला टॅक्समध्ये सूट, भूमी अधिग्रहणाची नुकसान भरपाई टॅक्स फ्री, लेदर सामान, नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौर उर्जा बॅटरी आणि पॅनल, पवन चक्की, आरओ, पॉईंट ऑफ सेल मशीन, पार्सल स्वस्त होणार आहे.

Web Title: What is expensive from 1st April? What's cheap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.