India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 05:41 PM2020-06-19T17:41:50+5:302020-06-19T17:45:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत

What is going on in the mind of India PM Narendra Modi against China?; Hints from BJP Ram Madhav | India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

Next
ठळक मुद्देगलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाहीआपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, भारताचे वीर जवानांच्या हौताम्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चीनचा बदला देण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनविरोधात सरकार आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत, त्यामुळे निश्चितच सरकारच्या मनात काहीतरी विचार सुरु आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत राम माधव म्हणाले, आपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे त्यामुळे निश्चितच ते व्यर्थ जाणार नाही. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला तो नरसंहार आहे. चीनच्या या करकुतीचा प्रत्येक पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारुन निषेध केला आहे.

तसेच भारतीय जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपलं बलिदान दिलं आहे. भारतीय सैनिकांनी चीनला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखलं आहे. चीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाही. चीनचे सैन्य पुढे येत असताना आपल्या सैनिकांनी त्यांना रोखलं आहे. करारानुसार हत्याराचा वापर करता येत नाही. आम्हाला शांतता हवी पण देशाच्या सन्मानासाठी नेहमीच सतर्कतेसोबत उभे आहोत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना मागे हटण्यास भारतीय सैन्यांनी मजबूर केले आहे असं राम माधव म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला होता. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताला शांतता हवी पण कोणीही असा भ्रम ठेवू नये, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. वीरता आमच्या देशाच्या चरित्र्याचा भाग आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिलं होतं. दरम्यान नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

Web Title: What is going on in the mind of India PM Narendra Modi against China?; Hints from BJP Ram Madhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.