बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले? सलमान खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:08 PM2021-11-14T21:08:06+5:302021-11-14T21:08:40+5:30

Demolition of Babri Masjid: काँग्रेस नेते Salman Khurshid  यांनी लिहिलेले ‘Sunrise over Ayodhya: Nationhood in Our Times’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय घडले होते, याचे वर्णनही या पुस्तकात करण्यात आले आहे.

What happened in the cabinet meeting the day after the demolition of Babri Masjid? Big secret blast of Salman Khurshid | बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले? सलमान खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट

बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले? सलमान खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट

Next

नवी दिल्ली -  काँग्रेस नेते सलमान खुर्शिद  यांनी लिहिलेले ‘सनराईझ ओव्हर अयोध्या, नेशनहुड इन आर टाइम्स’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय घडले होते, याचे वर्णनही या पुस्तकात करण्यात आले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी ते सर्वजण पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासाठी काय विचार करत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नरसिंह राव यांनी मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, असे सांगितले.  
खुर्शिद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, या अकल्पनिय घटनेने हळुहळू सर्वांना सुन्न केले. रविवारी मशीद पाडली गेली आणि ७ डिसेंबर रोजी सकाळी मंत्रिमंडळातील सदस्य संसद भवनातील कक्षात एकत्र झाले. सर्व उदास होते. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत भयाण शांतता पसरली होती.  घडलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांकडे शब्दही नव्हते. मात्र माधवराव शिंदे यांनी कोंडी फोडत पंतप्रधानांप्रति सहानूभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला तुमच्या सहानूभूतीची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.  चिंतीत पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेने  आम्हाला आश्चर्यचकीत केले. नरसिंह राव यांच्या या कठोर प्रतिक्रियेनंतर याविषयावर पुन्हा चर्चा करण्याचे काही औचित्यच उरले नाही आणि ती बैठक समाप्त झाली.

या पुस्तकात सलमान खुर्शिद लिहितात की, कल्याण सिंह यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकार ६ डिसेंबर रोजीच बरखास्त करण्यात आले.  आठवडाभरानंतर राष्ट्रपतींनी कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील भाजपाशासित सरकारे बरखास्त करण्यात आली.  मात्र मंदिर-मशिदीच्या राजकारणाने काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील अस्तित्व संकटात आणले. समाजवादी पक्ष आणि बसपाच्या अस्थायी सशक्तीकरणानंतर भाजपाला राज्य आणि केंद्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली, असे मतही सलमान खुर्शिद यांनी मांडले.  

Web Title: What happened in the cabinet meeting the day after the demolition of Babri Masjid? Big secret blast of Salman Khurshid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.