न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 05:08 PM2017-08-25T17:08:14+5:302017-08-25T17:15:39+5:30

दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते.

What happened in cbi court during ram rahim singh case verdict | न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

Next
ठळक मुद्देदुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते.गुरमीत राम रहीम न्यायाधिशांसमोर हात जोडून उभे होते.  सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी 2 वाजून 48 मिनिटांनी निकाल वाचायला सुरूवात केली.  

चंदीगड, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी होणार आहे. 
काय झालं कोर्टात -
दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते. गुरमीत राम रहीम न्यायाधिशांसमोर हात जोडून उभे होते. 
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी 2 वाजून 48 मिनिटांनी निकाल वाचायला सुरूवात केली.  या बहुचर्चित प्रकरणात 3 वाजता न्यायालयाने निर्णय देताना हे गंभीर प्रकरण असून रहीम यांना दोषी ठरवण्यात येत असल्याचं सांगितलं. निर्णय ऐकून राम रहीम यांच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. जवळपास सात ते 10 मिनिट ते स्तब्ध होते.  
निर्णय जाहीर केल्यानंतर पोलिसांनी राम रहीम यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अंबाला येथील तुरूंगात नेण्याची तयारी सुरू झाली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून रहीम यांना लपून कोर्ट परिसराच्या बाहेर नेण्यात आलं. पहिले त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रूग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना चोख सुरक्षा व्यवस्थेत अंबाला नेण्यात आलं. 
त्यापुर्वी कोर्टाने निकाल देण्याआधी कोर्ट परिसराचं अक्षरशः छावणीत रूपांतर झालं होतं. कोर्ट परिसरात फोन घेऊन नेण्यास बंदी घालण्यात आली होती.  
कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम- 
15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या  श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे. 
आले छावणीचे रूप -
सिरसा, चंदिगढ व पंचकुला या भागांना लष्करी छावण्यांचे रूप आले आहे. दोन्ही राज्यांच्या सर्व जिल्हाधिका-यांना जिल्ह्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यांनी प्रसंगी १४४ कलम लागू करावे, अशाही सूचना आहेत.  या दोन्ही राज्यांत सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहेत. तेथे प्रसंगी लष्कराला पाठवण्याची तयारीही केंद्राने ठेवली आहे. मात्र केंद्राकडून पुरेशी कुमक मिळाली नसल्याची तक्रार पंजाब सरकारने केली आहे. चंदिगढमध्ये येणा-या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. डेरा सच्च सौदाचा मुख्य आश्रम सिरसा येथे असून, तेथे गुरुवारीच १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चंदिगढहून २५0 किलोमीटरवर असलेल्या सिरसामध्ये आतापर्यंत राम रहीम यांचे एक लाखाहून अधिक अनुयायी जमले आहेत.  

Web Title: What happened in cbi court during ram rahim singh case verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.