चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:27 IST2020-05-12T17:24:26+5:302020-05-12T17:27:05+5:30
चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे.

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
कोलकाता : कोरोना व्हायरसचा फैलाव केल्याने जगभरातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यामुळे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे. जगात चीनविरोधी वातावरण असून १००० हून अधिक कंपन्या चीन सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त होते. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपन्यांना भारतात पोषक वातावरण देऊ, परवानग्या देऊ अशी आश्वासने द्यायला सुरुवात केली होती. मात्र, यावर नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोरोनामुळे चीनमधून कंपन्या बाहेर पडल्या तरी त्याचा फायदा भारताला होईल असे गरजेचे नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका बांग्ला न्यूज चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, असे खरोखरच होईल असे छातीठोकपणे सांगणे खरेच कठीण आहे, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
चीनने जर त्यांच्या चलनाचे अवमुल्यन केले तर चीनी उत्पादने आणखी स्वस्त होतील. यामुळे लोक चीनच्याच वस्तू खरेदी करतील. अमेरिका, ब्रिटन, जपान सारखे देश त्यांच्या जीडीपीचा मोठा हिस्सा खर्च करत आहेत. मात्र, भारताने आपल्या जीडीपीच्या एक टक्क्यांपेक्षाही कमी १.७ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना तयार केली आहे. ही रक्कम वाढवायला हवी, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
देशवासियांची मुख्य समस्या ही आहे की, त्यांच्याकडे आता खरेदीसाठी पैसे नाहीत. गरीब लोकांकडे पैसेच नसल्याने मागणी घटली आहे. यामुळे सरकारला सामान्य लोकांच्या हाती पैसा द्यावा लागेल. कारण श्रीमंत अर्थव्यवस्था चालवत नाहीत. तर हेच सामान्य लोक अर्थ व्यवस्थेचा गाडा पुढे नेतात. पुढील सहा महिन्यांपर्यंत या लोकांच्या हाती पैसा दिला पाहिजे. भलेही त्यांनी तो खर्च नाही केला तरी चालेल. प्रवासी मजुरांची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले
गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका