जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 10:42 AM2023-05-21T10:42:56+5:302023-05-21T10:43:12+5:30

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो.

What if the old owner not paid the electricity bill? will be recovered from the new owner; An important judgment of the Supreme Court | जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

googlenewsNext

- डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली: जागेच्या आधीच्या मालकाचे किंवा ताबेदाराने न भरलेले वीजबिल नंतरच्या मालक- ताबेदाराकडून वसूल केले जाऊ शकते, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो. पश्चिम बंगाल, आसाम आणि इतर ठिकाणच्या मालमत्ताधारकांनी वीजबिल भरले नसल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मालकांनी जागेच्या सुरक्षेवर कर्ज घेतले होते. नंतर जागा लिलावात “जसे आहे तसे" महाराष्ट्रातून अशा १९ प्रकरणांत सुप्रीम कोर्टात तत्त्वावर विकण्यात आल्या. नवीन अपील दाखल झाली. सुमारे दोन दशक हे मालकांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज न्यायालयात प्रलंबित होते. मालकांचा युक्तिवाद होता की, पूर्वीच्या मालकाची थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन थकबाकी असेल तर वीज पुरवठा नाकारण्यात आला होता. 

पूर्वीच्या मालकाची किंवा भोगवटादाराची थकबाकी नवीनकडून वसूल करण्याचा अधिकार विद्युत मंडळाला नाही, असे अर्जदारांचे म्हणणे होते. थकबाकी भरण्याची जबाबदारी केवळ त्याची आहे, ज्याला वीजपुरवठा केला जातो. थकबाकीला वीज कंपनीही जबाबदार आहे. त्यांनी वेळीच त्याची वीज खंडित केली नाही. कायद्यात ठोस तरतूद असल्याशिवाय एका व्यक्तीचे दायित्व दुसऱ्या व्यक्तीवर लागू केले जाऊ शकत नाही.

ज्या जागेसाठी आधीच वीज पुरवली गेली होती, त्या जागेवर नवीन कनेक्शनचा अर्ज हा पुनर्जोडणीसाठी अर्ज आहे. विद्युत कायदा वीज कंपन्यांना पूर्वीच्या मालकांची थकबाकी नवीन मालकांकडून वसूल करण्याचा अधिकार देतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

Web Title: What if the old owner not paid the electricity bill? will be recovered from the new owner; An important judgment of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.