Election: निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:31 PM2022-03-09T16:31:09+5:302022-03-09T16:31:42+5:30

Assembly Election 2022 Result: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का?

What is election confiscation? When deposits are confiscated, how many votes are required to save? Find out | Election: निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या 

Election: निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या 

googlenewsNext

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का? कुठलीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्याच रकमेला डिपॉझिट म्हटले जाते. जर कुठल्याही उमेदवाराला ठराविक मते मिळाली नाही, तर त्यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त केली जातात.

डिपॉझिटची रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डिपॉझिटच्या रकमेचा उल्लेख हा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स अॅक्ट १९५१ मध्ये आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अनामत रकमेचा उल्लेख प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट १९५२ मध्ये करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीमध्ये सामान आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी  वेगवेगळी अनामत रक्कम निश्चित केलेली आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांसाठीत सारखीच अनामत रक्कम निश्चित केलेली असते.
लोकसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराला २५ हजार तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते. तर विधानसभा निवडणुकीती सामान्य वर्गातील उमेदवारांना १० हजार आणि एससीएसटी वर्गातील उमेदवारांनी ५ हजार रुपये जमा करावे लागतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावी लागते.  

डिपॉझिट कधी जप्त होते 
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही उमेदवाराला त्या जागेवर पडलेल्या एकूण मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. 
- जर कुठल्याही जागेवर १ लाख मते पडली आणि तिथे पाच उमेदवारांना १६ हजार ६६६ पेक्षा कमी मते मिळाती तर त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त केली जाते. 
- हा फॉर्म्युला राष्ट्रपी आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्येही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी १/६ मते मिळवण्याची आवश्यकता असते. 

कुठल्या परिस्थितीत डिपॉझिट परत केलं जातं
-उमेदवाराला जेव्हा एकूण मतदानाच्या १/६ टक्क्यांपेक्षा मते मिळतात. तेव्हा त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जाते.
- जिंकणाऱ्या उमेदवरालाही त्याची डिपॉझिट रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली तरी ही रक्कम परत केली जाते.  
- मतदान सुरू होणयापूर्वी जर कुठल्याही उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते. 
- उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यावर किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर डिपॉझिट रक्कम परत केली जाते. 

Web Title: What is election confiscation? When deposits are confiscated, how many votes are required to save? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.