'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:40 AM2023-06-26T08:40:03+5:302023-06-26T08:40:26+5:30
मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री उशिरा परदेश दौऱ्यावरून दिल्लीत परतले. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. नड्डांसोबत दिल्लीचे सर्व खासदार उपस्थित होते. विमानातून विचारताच मोदींनी नड्डांना एक प्रश्न केला, देशात काय सुरु आहे? यावर नड्डांनीही उत्तर दिले.
मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते. यामध्ये मीनाक्षी लेखी, हर्षवर्धन, हंसराज हंस, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रमेश बिधूड़ी आणि प्रवेश वर्मा यांचा समावेश होता. नड्डांना भेटताच मोदींनी प्रश्न केला, देशात काय सुरु आहे. तेव्हा नड्डांनी सांगितले की, तुमच्या दौऱ्यामुळे देशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच सरकारच्या ९ वर्षांच्या कामांबाबत जनतेला सांगितले जात आहे, असे ते म्हणाले.
PM Modi lands in Delhi after concluding maiden state visits to US, Egypt
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/1gVv9cN2KG#PMModi#StateVisits#Egypt#US#JPNaddapic.twitter.com/Ixpf5DNejg
मीनाक्षी लेखी यांनी म्हटले की, परराष्ट्र दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदींना इज्जत आणि सन्मान मिळाला आहे. हे संपूर्ण देशासाठी सन्मानाचे आहे. हंसराज हंस यांनी म्हटले की, आम्ही मोदींना परराष्ट्र दौऱ्यासाठी अभिनंदन केले आणि या दौऱ्यात खूप चमकल्याचे सांगितले. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.