What is Smoke Candle: स्मोक कँडल म्हणजे काय? कशी असते? जी वापरून घुसखोरांनी लोकसभेत धूरच-धूर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:57 PM2023-12-13T14:57:26+5:302023-12-13T14:58:52+5:30
...या दोन निदर्शकांनी या संपूर्ण गोंधळादरम्यान संसदेत स्मोक कँडलचा वापर केला आणि संपूर्ण संसदेच धूरच-धूर पसरला.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशन सुरू असतानाच संसदेत अत्यंत भयंकर प्रकार घडला. संसदेची कारवाई सुरू असतानाच दोन जणांनी संसदेच्या प्रेक्षा गॅलरीतून उडी मारली. महत्वाचे म्हणजे, कडक सुरक्षा व्यवस्था असताना हा संपूर्ण प्रकार घडला. या दोन निदर्शकांनी या संपूर्ण गोंधळादरम्यान संसदेत स्मोक कँडलचा वापर केला आणि संपूर्ण संसदेच धूरच-धूर पसरला.
स्मोक कँडल म्हणजे काय? -
याच्या नावावरूनच लक्षात येते की, हा एक असा फटाका आहे, ज्यामुळे खूप सारा धूर निर्माण होतो. अशा प्रकारचे स्मोक कँडल आपण सर्वसाधारणपणे दिवाळी अथवा एखाद्या पार्टीमध्ये बघतो. गेल्या काही दिवासांपासून भारतात यांचा ट्रेंड सुरू आहे. आज याचाच वापर निदर्शकांनी देशाच्या संसदेत केला.
स्मोक कँडलचा इतिहास पाहिल्यास, याचे मूळ जपानच्या इतिसाहात आढळतो. मात्र, आधुनिका काळाचा विचार केल्यास, 1848 मध्ये ब्रिटिश इन्व्हेंटर रॉबर्ट येलने स्मोक कँडलचा शोध लावला आहे. तो तयार करताना चिनी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय यात, काही बदल करून अशा घटकांचा समावेश करणअयात आला आहे, ज्यांमुळे धूर अधिक वेळ टिकून राहील.
स्मोक कँडलचे बरेच प्रकार -
सध्या स्मोक कँडलचे बरेच प्रकार बाजारात बघायला मिळतात. ज्यांतून रंगीत धूरही निघतो. निदर्शकांनी संसदेमध्ये बुधवारी ज्या स्मोक कँडलने हल्ला केला, त्यातूनही लाल आणि पिवळ्या रंगाचा धूर पसरताना दिसला. हा धूर संपूर्ण संसद भवनात आणि ज्यावेळी निदर्शकांना पकडून नेले जात होते, तेव्हा दिसून आला.