मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचा फायदा काय ? बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:38 AM2023-10-03T06:38:37+5:302023-10-03T06:38:47+5:30
आरोग्य विभागाकडून बालकांमधील कुपोषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.
जयपूर : आरोग्य विभागाकडून बालकांमधील कुपोषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
जयपूरच्या अमृत माटी इंडिया ट्रस्टने केलेल्या संशोधनात मातीत विविध प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवल्यामुळे ते अधिक पोषक होतात. एवढेच नव्हे, तर महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासही मदत होईल.
बालकांमधील कुपोषण
केवळ ५४.९% बालकांना योग्य पद्धतीने स्तनपान केले जाते.
४१.६ % बालकांना जन्माच्या पहिल्या तासाभारत आईचे दूध मिळते.
देशातील ५ वर्षांखालील ३०.९% बालकांची वाढ सरासरीपेक्षा कमी
६ ते ५९ महिने वयोगटातील ७०% मुलांमध्ये ॲनिमियाची समस्या
देशातील ५ वर्षांखालील ३५.७% बालकांचे वजन सरासरीपेक्षा कमी
पोषणमूल्ये कोणात किती?
घटक प्रेशर कुकर मातीची भांडी
कर्बोदके ४१.५७ ग्रॅम ५०.७३ ग्रॅम
फायबर ९.६४ ग्रॅम १६.६४ ग्रॅम
प्रोटिन ११.१९ ग्रॅम १३.०८ ग्रॅम
व्हिटॅमिन ए ० मिलिग्रॅम १००.५ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन सी १.७३ मिलिग्रॅम ३.७९ मिलिग्रॅम
कॅल्शियम ११.९७ मिलिग्रॅम ३६.५३ मिलिग्रॅम
लोह २.७५ मिलिग्रॅम ३.८१ मिलिग्रॅम
पचन होईल योग्य
मातीच्या भांड्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते.
खाद्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार देशात १९.४४ कोटी लोक (लोकसंख्येच्या १४.५%) कुपोषित आहेत.