भारतात मूलं जन्माला आल्या नंतर पहिला शब्द काय बोलतात? पंतप्रधान मोदींनी बिलगेट्सना सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:38 AM2024-03-29T11:38:18+5:302024-03-29T11:40:07+5:30
मोदी म्हणाले, "भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये आम्ही मांला 'आई' म्हणतो आणि काही मुलं आपला पहिला शब्द 'एआई', असा उच्चारतात. हा गमतीचा भाग झाला, पण 'आई' आणि 'एआई' एकसारखेच वाटतात.''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी भारतातील डिजिटल क्रांती, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि यूपीआयच्या भूमिकेसंदर्भातही चर्चा केली. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर बोलताना पीएम मोदी गमतीत म्हणाले, भारतातील मुले एवढी प्रगत आहेत की, ते जन्माला आल्यानंतर पहिला शब्द 'एआई' बोलतात.
मोदी म्हणाले, "भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये आम्ही मांला 'आई' म्हणतो आणि काही मुलं आपला पहिला शब्द 'एआई', असा उच्चारतात. हा गमतीचा भाग झाला, पण 'आई' आणि 'एआई' एकसारखेच वाटतात.''
पीएम मोदी यांनी देशातील एआयच्या वापरासंदर्भातरीह भाष्य केले आणि म्हणाले. "मी भाषेच्या व्याख्येसाठी जी20 शिखर सम्मेलनादरम्यान एआयचा वापर केला. आपल्या सर्व ड्रायव्हर्सनी जी20 समिटदरम्यान एक एआय अॅप डाउनलोड केले होते. या अॅपचा वापर ते समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या विविध परदेशी पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी करत होते.
आपल्या नमो अॅपवर AI च्या वापरासंदर्भात बिलगेट्स यांना माहिती देनाता, पंतप्रधान मोदी यांनी बिल गेट्स यांना नमो अॅपच्या माध्यमाने सेल्फी घेण्यास सांगितले. यानंतर पीएम मोदींसोबतचे बिलगेट्स यांचे सर्व जुने फोटो मोबाइलवर दिसू लागले.