१२५ वर्षांच्या पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? अनेकांच्या मनात कुतहूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:41 AM2022-03-23T06:41:53+5:302022-03-23T06:42:52+5:30

स्वामी शिवानंद यांची देशभरात चर्चा आहे. स्वत: माेदी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली.

What is the secret of 125 years of longevity of Swami Sivananda? | १२५ वर्षांच्या पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? अनेकांच्या मनात कुतहूल

१२५ वर्षांच्या पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? अनेकांच्या मनात कुतहूल

Next

नवी दिल्ली : स्वामी शिवानंद... वय १२५ वर्षे... पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी हे याेगमहर्षी समाेर आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी स्वत: त्यांना वाकून नमस्कार केला. राष्ट्रपती रामनाथ काेविंद हेदेखील पुढे आले आणि त्यांना उभे राहण्यास मदत केली. स्वामी शिवानंद यांची देशभरात चर्चा आहे. स्वत: माेदी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली. या याेगमहर्षींबाबत चकीत करणाऱ्या काही गाेष्टी जाणून घेऊया.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हाेणारे स्वामी शिवानंद हे सर्वाधिक वयाेवद्ध व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म वाराणसीत ऑगस्ट १८९६ मध्ये झाल्याचे बोलले जाते. या वयातही दरराेज तासानतास याेगसाधना करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे. त्यांच्या निराेगी आणि दीर्घायुष्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष वेधले गेले. साधे राहणीमान आणि साधा आहार, असे त्यांचे आयुष्य आहे.

स्वामी दरराेज पहाटे ३ वाजता उठतात. काेणाचीही मदत न घेता ते दरराेज याेगासने करतात. काेणतीही वैद्यकीय गुंतागुंत नसून, ते पूर्णपणे फिट आहेत. स्वामी ६ वर्षांचे हाेण्यापूर्वीच त्यांचे आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यांनी कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आणि ब्रह्मचर्याचा मार्ग निवडला. 
स्वामींनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. ते म्हणतात, विश्व हे माझे घर आहे. या जगातील सर्व लाेक माझे आई-वडील आहेत. त्यांच्यावर प्रेम करणे आणि सेवा करणे, हाच माझा धर्म आहे.
निराेगी आयुष्यासाठी याेगसाधनेचाच मार्ग आहे, असा स्वामींचा ठाम विश्वास आहे. याेगामुळे मन, इच्छा आणि संवेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इश्वर आणि ज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग आहे.

योगसाधना
स्वामींचे वय १२५ वर्षे आहे.  दरराेज याेगसाधना, तेलरहीत आणि उकडलेला आहार, मानवाप्रती नि:स्वार्थ सेवा हे त्यांच्या निराेगी आणि शिस्तप्रिय आयुष्याचे रहस्य आहे. 
गेल्या तीन दशकांपासून ते काशीच्या घाटांवर स्वत: याेग करतात आणि इतरांना शिकवतात. गेल्या ५० वर्षांपासून ते पुरी येथील कृष्ठराेग्यांची सेवा करीत आहेत.

Web Title: What is the secret of 125 years of longevity of Swami Sivananda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.