चंद्रावर तापमान आहे तरी किती? ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 08:16 AM2023-08-28T08:16:45+5:302023-08-28T08:28:32+5:30
विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे तापमानाची माहिती घेतली.
नवी दिल्ली : चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने सर्वप्रथम चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. पृष्ठभागाच्या आत आणि वर नेमके किती तापमान आहे, याची अचूक माहिती हाती आलेली आहे. खाेलीनुसार तापमानात कसा बदल हाेताे, याचा अंदाज त्यातून मिळाला आहे.
तापमान माेजणारा ‘चास्टे’
- विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे तापमानाची माहिती घेतली.
- ‘चास्टे’वर विविध प्रकारचे १० तापमानमापक सेन्सर लावण्यात आले आन्त.
ते पृष्ठभागाखाली १० सेंटिमीटरपर्यंत जाऊन तापमान माेजू शकतात.
काय आढळले?
पृष्ठभागाच्या आत सुमारे ८० मिलिमीटरपर्यंत तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत आढळून आले. तर, पृष्ठभागाच्या वर तापमान ५० ते ६० अंश सेल्सिअसपर्यंत माेजण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागाच्या आत विविध खाेलीवर आणि पृष्ठभागावरील तापमानात खूप फरक असल्याचे यातून स्पष्ट हाेत आहे.
इस्राेचे प्रमुख डाॅ. एस. साेमनाथ यांनी सांगितले, की दक्षिण ध्रुवावर मानवाला वसविण्याची क्षमता असू शकते. म्हणूनच विक्रम लँडर याच ठिकाणी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.